Join us  

६ व्या लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (लिफ्फी) यंदा पार पडणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 6:03 PM

सहाव्या लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘लिफ्फी २०२१’ यंदा २४ ते २६ सप्टेंबर, १ ते ३ ऑक्टोबर आणि ८ ते १० ऑक्टोबर या दरम्यान दररोज संध्याकाळी ६ वाजता ऑनलाइन आयोजित केला जाणार आहे.

सहाव्या लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘लिफ्फी २०२१’ यंदा २४ ते २६ सप्टेंबर, १ ते ३ ऑक्टोबर आणि ८ ते १० ऑक्टोबर या दरम्यान दररोज संध्याकाळी ६ वाजता ऑनलाइन आयोजित केला जाणार आहे. तीन वीकएण्ड्सपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवातून प्रसिद्ध सिनेनिर्माता शक्ती सामंता यांना विशेष श्रद्धांजली दिली जाईल आणि त्यांची काही संस्मरणीय चित्रपट प्रदर्शितही केले जातील. 

महोत्सवाच्या संचालनाची जबाबदारी माधव तोडी यांच्याकडे आहे आणि महोत्सवाचे कार्यक्रम प्रमुख (क्यूरेटर) म्हणून विवेक वासवानी भूमिका बजावतील. तर सिनेजगतातील प्रख्यात नावे महोत्सवात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांना अभिजात दर्जा का आणि कसा मिळाला याच्या ठळक कारणांचा माग घेणाऱ्या प्रदर्शनपूर्व चर्चेत भाग घेतील. यात आशिम सामंता, संदिप सोपारकर, पूजा देसाई, ब्रह्मानंद सिंह, ज्योतीन गोयल, तुषार भाटिया, दिव्य सोलगमा आदींचा समावेश अपेक्षित आहे. दररोज एक चित्रपट प्रदर्शित केला जाईल आणि एकूण नऊ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट महोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दाखवले जातील. महोत्सवाचे अनावरण आणि समापनाला दाखविले जाणारे चित्रपट म्हणजे ‘अँन इव्हनिंग इन पॅरिस’ आणि ‘पंचम अनप्लग्ड.’

यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षकांना महोत्सवातील चित्रपट पाहता येतील आणि त्यांच्या घरातच बसून चित्रपटांवरील खुमासदार चर्चांमध्ये सहभाग देखील नोंदविता येईल. त्यासाठी प्लेक्सिगो (यूएफओ मूव्हीजचे एक अंग)  हे मोबाईल अँप त्यांना www.onelink.to/Plexigowww.onelink.to/Plexigo या दुव्यावर जाऊन डाऊनलोड करावे लागेल. चित्रपट महोत्सवासंबंधी अधिक माहिती www.liffi.in या संकेतस्थळावर जाऊन मिळविता येऊ शकेल. फेसबुक: https://www.facebook.com/LIFFIIndia/ आणि इंस्टाग्राम: ifliffi_india येथूनही ती मिळविता येईल.

शक्ती सामंता यांना आदरांजलीचा भाग म्हणून, महोत्सवाचा पहिला वीकएण्ड शम्मी कपूर स्पेशल असेल आणि त्यांचे सदाबहार चित्रपट: अँन इव्हनिंग इन पॅरिस, काश्मीर की कली आणि चायना टाउन हे या दरम्यान दाखवले जातील. दुसरा वीकएण्ड तुम्हाला राजेश खन्ना यांच्या रोमँटिक सिनेप्रवासामध्ये घेऊन जाईल आणि आराधना, कटी पतंग आणि अमर प्रेम यासारखी त्यांची काही अनमोल रत्ने प्रेक्षकांनी जोखता येतील.

तिसरा वीकएण्ड संमिश्र असेल आणि त्यात प्रदर्शित होतील: बरसात की एक रात, अमानुष आणि पंचम अनप्लग्ड. प्रत्येक चित्रपट सुरू होण्यापूर्वी, पॅनेलिस्टसह चित्रपटावर परिसंवाद आणि चर्चा होईल.

टॅग्स :राजेश खन्नाशम्मी कपूर