6398_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:29 IST
करिना आणि अर्जुन यांची जोडी कि अँड का या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली होती. करिना ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी असूनही त्यांची जोडी ऑन स्क्रिन खूपच छान वाटली होती.
6398_article
करिना आणि अर्जुन यांची जोडी कि अँड का या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली होती. करिना ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी असूनही त्यांची जोडी ऑन स्क्रिन खूपच छान वाटली होती. रणबीर आणि कोंकणा सेन शर्मा वेक अप सिड या चित्रपटात एकत्र झळकले होते. कोंकणा ही रणबीरपेक्षा वयाने मोठी आहे. पण या चित्रपटातील रणबीर आणि कोंकणा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अक्षय कुमार आणि रेखा यांनी खिलाडीयों का खिलाडी या चित्रपटात एकत्र काम केले होते. रेखा अक्षयपेक्षा जवळजवळ वीस वर्षांनी मोठी आहे. रेखा इतकी मोठी असली तरी ते चित्रपटात कुठेच जाणवले नव्हते. श्रीदेवी आणि शाहरुख खान यांची जोडी आर्मी या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातले श्रीदेवी आणि शाहरुख यांच्या जोडीवर चित्रीत केलेले एक गाणे तर प्रचंड गाजले होते. दिल चाहता है या चित्रपटात अक्षय खन्ना हा कॉलेजमध्ये शिकणारा दाखवला होता तर डिम्पल ही एका मुलीची आई दाखवली होती. अक्षय तिच्याकडे आकर्षित होतो असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. या चित्रपटात अक्षय आणि डिम्पलची जोडी खूपच छान वाटली होती