Join us

6313_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 15:21 IST

आधुनिक जगात रस्त्यांची आवश्यकता खूपच आहे. अमेरिकन रोड अँड ट्रान्सपोर्टेशन बिल्डर्स असोसिएशनच्या अनुसार केवळ चार दशलक्ष मैल रोड हे एकट्या अमेरिकेत आहेत. जगभरातील सर्वच म्हणजे सातही खंडात रस्ते आहेत. अगदी अंटार्क्टिकावर सुद्धा. समुद्राखाली देखील रस्ते आहेत. जगभरातील अशाच रस्त्यांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.

आधुनिक जगात रस्त्यांची आवश्यकता खूपच आहे. अमेरिकन रोड अँड ट्रान्सपोर्टेशन बिल्डर्स असोसिएशनच्या अनुसार केवळ चार दशलक्ष मैल रोड हे एकट्या अमेरिकेत आहेत. जगभरातील सर्वच म्हणजे सातही खंडात रस्ते आहेत. अगदी अंटार्क्टिकावर सुद्धा. समुद्राखाली देखील रस्ते आहेत. जगभरातील अशाच रस्त्यांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.एकविसाव्या शतकात भविष्यातील रस्ते कसे असावेत यावर अनेक जण चर्चा करतात. वाया जाणारी जागा कशा पद्धतीने पर्यावरणपूरक असेल, काँक्रिट रोड हिरवळीने सजलेले कसे असावेत यावर चर्चा होते. युरोपचा सोलारोड आणि उत्तर अमेरिकेचा सोलार रोडवेज असे दोन प्रकल्प समोर आले आहेत. सोलार रोडवेजचे मॉडेल नॉर्विच सिव्हील इंजिनिअरींग प्रा. एडवीन स्मेकपेपर यांनी तपासले आहेत. यावरुन लक्षावधी टनाचा लोड जरी गेला तरी काही होणार नाही. डेव्हलपर्सनी यावर आणखी चर्चा करुन हीट पॅड्स आणि एलईडीची रचना केली आहे. त्याशिवाय इलेक्ट्रीकल आणि दूरसंचारसाठी लागणारी वायर यांचा याखाली वापर करणे, रस्त्यावरील प्रदूषणकारी साहित्य बाजूला सारणे यांचा यात समावेश आहे. सध्या रस्त्यावरील वाहतुकीमुळे जगाच्या चार पट उर्जा निर्माण होत असते. सध्या ड्रायव्हरशिवाय गाडी, इलेक्ट्रीक कार यांच्यावरही चर्चा सुरू आहे.इस्त्राईलचा हायवे ९० हा रस्ता तुम्हाला अगदी जबरदस्त वाटेल. उत्तर-दक्षिण भागाला जोडला जाणारा हा रस्ता मृत समुद्राच्या जवळून जातो. समुद्रसपाटीपासून १४०० फुट खाली असणारा हा रस्ता आहे. या ठिकाणी तुमच्या फुफ्फुसावाटे ५ टक्के अधिक आॅक्सिजन ओढला जातो. हा मृत समुद्राजवळील हायवे असाही ओळखला जातो. यावर इस्त्राईलचे पूर्ण लक्ष आहे. पर्यटकांसाठीचे हे आवडते ठिकाण आहे.काराकोरम हायवे हा जगातील आठवे आश्चर्य म्हटले तरी वेगळे वाटू नये. चीन आणि पाकिस्तान यांना जोडणारा रस्ता म्हणून याकडे पाहिले जाते. गिलगिट-बाल्टिस्तानच्या पर्वतरांगामधून आणि सिंकाँग उईघुरमधून जातो. गिल्गिट-बाल्टिस्तानचा रस्ता हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा भाग आहे. खुंजरेब खिंडीतून जातो. त्याशिवाय समुद्रसपाटीपासून १५,३९७ फुट इतक्या उंचीवर असल्याने नेहमीच आॅक्सिजनची कमतरता भासते. या ठिकाणी तुम्हाला नेहमीच अशक्तपणा जाणवू शकतो.सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हा अत्यंत कठीण रस्ता आहे. या ठिकाणी केसात लावणाºया पिनच्या आकाराचे रस्ते आहेत. त्यामुळे याला जगातील सर्वात कठीण रस्ता असेही म्हटले जाते. आठ एल आकाराचे भाग असून, २७ टक्के असाच प्रकार आहे. त्याशिवाय ४०० फूट लांबीचा उतार आहे. याच्या अवतीभोवती खूप फुले आहेत.आॅस्ट्रेलियाचा इअर हायवे हा सर्वात लांब आणि निमर्नुष्य रस्ता म्हणून ओळखला जातो. १००० मैल लांब असणाºया रस्त्यावर फारसे कोणी नसते. कॅगुना रोडहाऊस ते बॅलाडोना रोडहाऊस दरम्यान रस्ता आहे. ९१ मैल रस्ता तर अगदीच सरळ आहे. त्यामुळे तुम्हाला खूपच कंटाळवाणे वाटले तर नवल नसावे.