5348_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 15:21 IST
पुतळे हे मानवी संस्कृतीचा एक भाग आहेत. आपल्या ध्येयपूर्तीचे ते स्मारक असतात किंवा ध्येयपूर्ती करुन स्वत: त्याचे निर्माण करतात. पुतळे संपूर्ण संस्कृतीची माहिती देतात, अगदी मृतप्राय अवस्थेमधील. कधी ते आळंबीसारखेही असतात, अगदी खोल खोल, गडद अंधारातील दु:स्वप्नासारखे. हे पुतळे आणि शिल्पे आपल्याला वेगळी वाटू शकतात तर काही वेळा अत्यंत विचित्र भावनेतून काढलेली दिसतात. अशाच काही पुतळ्यांची आणि शिल्पांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
5348_article
पुतळे हे मानवी संस्कृतीचा एक भाग आहेत. आपल्या ध्येयपूर्तीचे ते स्मारक असतात किंवा ध्येयपूर्ती करुन स्वत: त्याचे निर्माण करतात. पुतळे संपूर्ण संस्कृतीची माहिती देतात, अगदी मृतप्राय अवस्थेमधील. कधी ते आळंबीसारखेही असतात, अगदी खोल खोल, गडद अंधारातील दु:स्वप्नासारखे. हे पुतळे आणि शिल्पे आपल्याला वेगळी वाटू शकतात तर काही वेळा अत्यंत विचित्र भावनेतून काढलेली दिसतात. अशाच काही पुतळ्यांची आणि शिल्पांची माहिती या ठिकाणी देत आहोत.आक्राळविक्राळ प्राण्यांचे हे पार्क हे दु:खद आणि हृदयद्रावक आहे. इटलीमधील बोमझारो शहरात हे वसले आहे. या बागेमध्ये अनेक शिल्पे आहेत. भीतीदायक चित्रे, लोकांना खाण्यासाठी तयार असलेला ड्रॅगन, मृत सैनिकाचे शरीर घेऊन निघालेला हत्ती, अर्धे महिलेचे शरीर आणि अर्धे सापाचे शरीर असलेले शिल्प, अत्यंत शांत वाटत असलेल्या सिंहाची जोडी यांचा यात समावेश आहे. या बागेत कायम भयाण शांतता असते. ड्यूक पिअरफ्रान्सेस्को ओर्सिनी याने याला ‘व्हिसिनो’ हे नाव दिले. हा एक सैनिक आहे. १५५० साली इटलीमध्ये युद्धात त्याचा मित्र मरण पावला त्यानंतर तो आपल्या मृत पत्नीला पहायला आला. त्यानंतर हे पार्क उभे केले. अजून ते सुरूच आहे. रशियामधील झेलेन्झोडस्क येथील माशुक अक्वा टर्म स्पामध्ये तुम्हाला हे शिल्प दिसेल. पिचकारी म्हणजे तुम्ही दररोज वापरता त्याप्रमाणे नव्हे. २००८ साली या स्पाने हे शिल्प तयार केले. पचनसंस्थेसंदर्भातील हा स्पा आहे. या शिल्पामध्ये तीन गोंडस बालके आहेत. विख्यात चित्रकार अलेक्झांड्रो बोटीसेली यांच्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. याची किंमत ४२ हजार डॉलर्स इतकी आहे. ट्रान्सी हे चबुतºयाच्या आकाराचे शिल्प आहे. १४ व्या शतकात हे खूप लोकप्रिय झाले. यातील बरेचसे चबुतरे हे मृत व्यक्तीचे आहेत. सुरुवातीला झोपलेल्या व्यक्तीची संकल्पना होती, नंतर ती बदलून उभ्या असलेल्या व्यक्तीची केली. फ्रान्समधील बार ली ड्यूकमधील सेंट एरिनी चर्चमध्ये ट्रान्सी डी रेनी डी चेलॉन या राजपुत्राच्या शिल्पाची उभारणी करण्यात आली आहे. १५४४ साली एका युद्धात हा २५ वर्षीय राजकुमार मारला गेला होता. ब्लॅक अॅगी या नावावरुनच सारे काही लक्षात येते. आपल्याभोवती कापड गुंडाळून बसलेल्या काळ्या स्त्रिचा हा पुतळा आहे. वॉशिंग्टन डी. सी. मधील नॅशनल कोर्टच्या आवारात हा पुतळा आहे. स्मिथसोनियन हिची कलाकृती नाकारण्यात आल्यानंतर या ठिकाणी बसविण्यात आली आहे. १८८५ साली हेन्री अॅडम्स याच्या पत्नीने नैराश्येतून फोटो काढण्याचे रसायन पिवून आत्महत्या केली होती. तिचा ‘क्लोव्हर’ या नावाने हा पुतळा तयार कण्यात आला होता. मेक्सिकोमधील चिव्हुहा येथे दुकानाच्या खिडकीमध्ये बसलेला हा पुतळा आहे. २५ मार्च १९३० साली याची उभारणी झाली. अगदी जवळून पाहिल्यास याच्या भीषणतेविषयी कल्पना येईल. लग्नाच्या गाऊनमध्ये बसलेली ही महिला आहे. लग्नाच्या दुसºया दिवशी विषारी कोळी चावून तिचा मृत्यू झाला होता. तिचे नाव विसरले गेले. आता या पुतळ्याला ‘ला पास्कलिता’ असे म्हटले जाते. हिरवळ असणाºया आणि आयर्लंडच्या जंगलात जाणारे हे सापळ्याचे शिल्प आहे. किंवा एक मूल जे रांगत या सापळ्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी याची थीम आहे. व्हिक्टोरिया वे येथील इंडियन स्कल्प्चर पार्कमध्ये याची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ३३ काळ्या रंगाची आणि तीन कांस्य शिल्पे आहेत. २२ एकर पार्कमध्ये याची उभारणी करण्यात आली आहे.