Join us

5102_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 15:58 IST

स्मार्ट फोनवर आपण काय करतो? सेल्फी घेतो, आपला बराचसा वेळ वाया घालवितो. काहीही कारण नसताना स्मार्ट फोनवर उपयोगी नसलेली अ‍ॅप आपण आणून ठेवलेली असतात. तथापि जे लोक क्रियाशील असतात, ते यापेक्षा वेगळे काही तरी करतात. टाईमपास टाळून ते आपला वेळ चांगल्या कामावर घालवितात. ते स्मार्ट फोनचा वापर अगदी वेगळ्या पद्धतीने करतात. अशाच कामांविषयी माहिती देत आहोत.

स्मार्ट फोनवर आपण काय करतो? सेल्फी घेतो, आपला बराचसा वेळ वाया घालवितो. काहीही कारण नसताना स्मार्ट फोनवर उपयोगी नसलेली अ‍ॅप आपण आणून ठेवलेली असतात. तथापि जे लोक क्रियाशील असतात, ते यापेक्षा वेगळे काही तरी करतात. टाईमपास टाळून ते आपला वेळ चांगल्या कामावर घालवितात. ते स्मार्ट फोनचा वापर अगदी वेगळ्या पद्धतीने करतात. अशाच कामांविषयी माहिती देत आहोत.क्रियाशील लोक पॉडकास्टचा उपयोग शोध लावण्यासाठी करतात आणि त्यांना कान देऊन ऐकतात. यावर अगदी महत्वाची माहिती मिळते. तसेच बाहेर असताना मोठी चर्चाही करता येते. यामध्ये विपणनपासून राजकारण आणि धार्मिक विषयांचा समावेश असतो. ते आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत अशा गोष्टी ऐकत असतात.ज्या लोकांना आपला वेळ वाया घालवायचा नसतो, ते विविध लेख शोधून त्यांचा संचय करतात. आपल्या प्रवासादरम्यान हे लेख ते वाचतात. फ्लिपबोर्ड आणि पॉकेट या अ‍ॅप्समध्ये आपल्या ग्राहकांना अगदी ते आॅफलाईन असले तरी असे लेख नंतर वाचता येतील अशी सोय करण्यात आली आहे.क्रियाशील लोकांना गुगल मॅप्सचा वापर करुन नवनवीन ठिकाण शोधण्याचे कसब असते. ते इतर लोकांवर अवलंबून राहत नाहीत. त्यांना ज्या ठिकाणी जायचे आहे, ते ठिकाण अगदी अचूक पद्धतीने आपल्या वाहन चालकांना सांगतात.आपल्या आवडीच्या विषयाच्या बातम्या टी. व्ही. वर पाहण्याचे दिवस आता गेले. हे सारे आता स्मार्ट फोनवर अगदी सहजगत्या आणि वेगाने मिळू शकते आणि दिसूही शकते.क्रियाशील लोक आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत नेहमीच दक्ष असतात त्याशिवाय आहारातील कॅलरीजचे प्रमाण आणि जळणाºया कॅलरीजबाबत आपल्या फोनद्वारे सातत्याने माहिती घेत असतात.साधारणत: आपल्या फोनमध्ये अनेक प्रकारच्या अ‍ॅपची गर्दी असते. बºयाचवेळा आपण त्याचा वापरही करीत नसतो. क्रियाशील लोक असे करीत नसतात. अ‍ॅपचा वापर करण्याबाबत ते अगदी काळज़ीपूर्वक असतात. आपल्या फोनमध्ये कोणत्या गोष्टींना जागा द्यायची याबाबत ते दक्ष असतात.क्रियाशील लोक ट्विट करण्यात आणि ‘लाईक’ करण्यात वेळ घालवत नाहीत.क्रियाशील लोक आपल्या फोनमधील कॅमेºयाचा पूर्ण वापर करतात. फोनमध्ये असणारे सर्व फिचर्सची त्यांना माहिती असते आणि काही चांगले क्षण कॅमेराबंद करण्यासाठी ते धडपडत असतात.त्यांचे बरेचसे काम हे ई-मेल्सवर चालते. त्याचा योग्य तºहेने ते वापर करीत असतात.क्रियाशील लोकांना आपला फोन केव्हा सुरु करायचा आणि बंद करायचा याचे ज्ञान असते. ते फोनचे गुलाम नसतात. फोनपासून केव्हा दूर जायचे आणि आपल्या जवळच्यांशी केव्हा बोलायचे हे त्यांना माहिती असते.