‘5वेडिंग्स’चा ट्रेलर लॉन्च! नर्गिस फाखरी व राजकुमार रावची रंगणार रोमॅन्टिक-कॉमेडी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 11:40 IST
‘5 वेडिंग्स’ हा चित्रपट रिलीज आधीचं चर्चेत आहे. तुम्हाला माहित असेलचं की, रोमॅन्टिक कॉमेडी जॉनरचा हा चित्रपट एक हॉलिवूड चित्रपट आहे.
‘5वेडिंग्स’चा ट्रेलर लॉन्च! नर्गिस फाखरी व राजकुमार रावची रंगणार रोमॅन्टिक-कॉमेडी!!
‘5 वेडिंग्स’ हा चित्रपट रिलीज आधीचं चर्चेत आहे. तुम्हाला माहित असेलचं की, रोमॅन्टिक कॉमेडी जॉनरचा हा चित्रपट एक हॉलिवूड चित्रपट आहे. इंडो-अमेरिकन प्रॉडक्शनच्या या चित्रपटात नर्गिस फाखरी आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर झाला. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर्स समोर आलेत आणि तेव्हापासून लोक या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करू लागलेत. पण आता ही प्रतीक्षा संपलीय. होय, ‘5 वेडिंग्स’चा ट्रेलर लॉन्च झालाय. चित्रपटाचे नाव ‘5 वेडिंग्स’ आहे, यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे. ती म्हणजे, चित्रपटाची कथा लग्नाच्या अवतीभवती फिरणारी असणार आहे. ट्रेलरनंतर या कथेवर आणखी प्रकाश पडला आहे. होय, ‘5 वेडिंग्स’ ही एका अमेरिकेत राहणा-या महिला पत्रकाराची कथा आहे, हे ट्रेलरमध्ये दिसतेय. महिला पत्रकाराची ही भूमिका नर्गिस फाखरी साकारतेय. मी भारतावर आधारित बातम्या दिल्यात तर माझे प्रमोशन होऊ शकते, असे ती ट्रेलरमध्ये आपल्या बॉसला म्हणताना दिसतेय. बॉस तिला याची परवानगी देतो आणि नर्गिस भारतातील लग्न कव्हर करायला निघते. भारतात तिची ओळख एका पोलिस अधिका-यासोबत होते. जो खास तिच्या सुरक्षेसाठी तैनात केला गेला असतो. हा पोलिस अधिकारी म्हणजे अर्थातचं राजकुमार राव. हा पोलिस अधिकारी प्रत्येक बाबतीत नर्गिसवर संशय घेतो आणि याच प्रवासात नर्गिस राजकुमारच्या प्रेमात पडते, असे याचे कथानक आहे. चित्रपटात नर्गिस व राजकुमार यांच्याशिवाय हॉलिवूड कलाकार कँडी क्लार्क, बो डेरेक आणि एनेलिस वॅन डर पूल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नम्रता सिंह गुजराल दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.ALSO READ : नर्गिस फाखरी व मॅट अलोंजोचे प्रेम बहरात! किस करतानाचा व्हिडिओ केला शेअर!!