Join us

५ फूट ८ इंचाचा शाहरूख खान ‘या’ तंत्राने झाला चक्क अडीच फूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 22:33 IST

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या आगामी ‘झीरो’ या चित्रपटाचा टिजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामधील त्याचा बुटका अवतार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’चे दिग्दर्शक आनंद एल राय त्यांच्या प्रत्येक चित्रपटात नव्या पद्धतीने परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळेस आनंद यांनी कथेनुसार शाहरूख खानला ५ फूट ८ इंच हाइटऐवजी केवळ अडीच फूट दाखविले आहे. होय, शाहरूख खानच्या बहुचर्चित ‘झीरो’ या चित्रपटाविषयी आम्ही तुम्हाला सांगत असून, हा चित्रपट याच वर्षाच्या ख्रिसमस वीकमध्ये प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी आणखीनच उत्सुकता वाढली आहे. टीजरमध्ये सलमान शाहरूख खानच्या मागून येताना दिसतो. त्यानंतर शाहरूख चक्क सलमानच्या कडेवर बसलेला दिसतो. तसेच त्याला किस करतानाही बघावयास मिळतो. सध्या शाहरूखच्या याच बुटक्या अवतारावरून प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगत आहे. अखेर शाहरूखला अशापद्धतीने कसे दाखविले असेल? असे प्रश्न त्यांच्यात उपस्थित केले जात आहेत. आज आम्ही याच टेक्निकविषयी तुम्हाला सांगणार आहोत. २००१ मध्ये पीटर जॅकसनच्या ‘द लॉर्ड आॅफ द रिंग्स’मध्ये जबरदस्त स्पेशल इफेक्ट्स दाखविण्यात आले होते. यामध्येही बºयाचशा कलाकारांना फोर्स्ड पर्सपॅक्टिव्ह टेक्निकने बुटक्या अवतारात दाखविण्यात आले होते. २०१२ ते २०१४ दरम्यान प्रदर्शित झालेल्या पीटर जॅक्सनच्या ‘द हॉबिट’ चित्रपटाच्या तिन्ही भागांमध्ये या स्पेशल तंत्राचा वापर करण्यात आलेले जगाने बघितले. शाहरूखच्या ‘झीरो’मध्ये त्याला बुटक्या अवतारात दाखविण्यासाठी दोन प्रकारचे सेट तयार करण्यात आले होते. एक सेट आणि कॅमेरा शाहरूखला बुटक्या अवतारात दाखविण्यासाठी तर दुसरा सेट आणि कॅमेरा इतर कलाकारांना मोठे दाखविण्यासाठी उभारला होता. दोन्ही कॅमेºयांना शूट केलेल्या दृश्यांना स्पेशल कॅमेºयावर सीक करण्यात आले. त्यानंतर ते दृश्य ओव्हरलॅप केले गेले. या तंत्रामुळे कॅमेरा लेन्सने आॅब्जेक्टला (शाहरूख) एका ठराविक अंतरावर दाखविले जाते. त्यामुळे तो बुटका दिसण्यास मदत होते. दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती शाहरूखच्याच ‘रेड चिलीज फिल्म’ प्रॉडक्शन हाउसकडून केली जात आहे. ज्यांच्याकडून फोर्स्ड पर्सपेक्टिव्ह तंत्रज्ञानाचे आधारे शूट करण्यासाठी दोन वर्षांपासून तयारी केली आहे. या तंत्राद्वारे त्याच पद्धतीने काम केले जाते, ज्याच्याद्वारे एकाच फ्रेममध्ये कॅमेºयाच्या अगदी जवळ ठेवलेली वस्तू दूर दिसते अन् तिचा आकार छोटा दिसतो. या चित्रपटात शाहरूखसोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा, अभय देओल यांसारख्या स्टार्सच्या प्रमुख भूमिका आहेत.