4936_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 15:54 IST
सध्या सुट्यांचे दिवस आहेत. बºयाच जणांनी बरेचसे प्लॅन केलेले असतील, परंतू काही असेही असतील, ज्यांनी यावर्षी घरी राहूनच यावर्षीच्या सुट्या एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला असेल. अशा वेळी तुम्ही घरी काय कराल? होम थिएटरवर काय पाहाल? यासाठी अॅनिमेशन मुव्हीजचा पर्याय उत्तम आहे. पॉपकॉर्नसोबत किंवा पिझ्झा खात तुम्ही या अॅनिमेशन मुव्हीज पाहू शकाल. अशाच मुव्हीजची माहिती आम्ही देत आहोत.
4936_article
सध्या सुट्यांचे दिवस आहेत. बºयाच जणांनी बरेचसे प्लॅन केलेले असतील, परंतू काही असेही असतील, ज्यांनी यावर्षी घरी राहूनच यावर्षीच्या सुट्या एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला असेल. अशा वेळी तुम्ही घरी काय कराल? होम थिएटरवर काय पाहाल? यासाठी अॅनिमेशन मुव्हीजचा पर्याय उत्तम आहे. पॉपकॉर्नसोबत किंवा पिझ्झा खात तुम्ही या अॅनिमेशन मुव्हीज पाहू शकाल. अशाच मुव्हीजची माहिती आम्ही देत आहोत.भविष्यात पृथ्वी हा कचºयाचे मोठे मैदान बनेल आणि आपले आयुष्य अगदी कचºयासारेखच झाले असेल. पृथ्वीवर राहणे बिकट झाल्याने अनेक जण अंतराळात राहत असतील. वॉल-ई हा कचºयाचा कॉम्प्रेसर आहे. त्याचा एकमेव दोस्त झुरळ आहे. एके दिवशी ईव्ह हा रोबो पृथ्वीवरील राहणीमान पाहण्यासाठी पाठविला जातो. त्यानंतरची स्टोरी या चित्रपटात आहे. कार्ल फ्रेडीक्सन हा इलि या मुलीशी भेटतो. हे दोघेही दक्षिण अमेरिकेत जाण्याचा विचार करतात. पॅराडाईज धबधब्याजवळ एक इमारत बांधतात. ७० वर्षानंतर इलिचा मृत्यू होतो आणि कार्ल हा दिलेले वचन पूर्ण करु शकत नाही. कार्ल आपले घर सोडतोे आणि निवृत्तीनंतर या घरात राहण्यासाठी येतो. या घराला तो हजारो फुगे जोडतो आणि पॅराडाईज धबधब्याजवळ उतरतो. कार्लला विनातिकीट यात्रेकरु असल्याचे माहिती नसते. इलि आणि कार्लचे पॅराडाईज धबधब्यावर घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल का? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. अँडी हा लहान मुलगा असतो, ज्याला आपल्या खेळण्यासोबत खेळण्याचा छंद असतो. त्याच्याकडे बाहुली असते, ‘वुडी’. एकदा अँडीची आई त्याला आणखी एक खेळणे भेट देते. काही दिवसात हा बझ अँडीच्या वुडीची जागा घेतो. अँडी बझवर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करतो. दरम्यानच्या काळात अँडी आणि त्याचा परिवार नवीन घरात राहण्यासाठी जातात. अँडी या दोघांना घेऊन जातो का? यासाठी हा चित्रपट पहावा लागेल. नेमो, हा मजेदार मासा आहे. बोटीवर एकदा सापडतो आणि त्याला सिडनीमधील तळावर असलेल्या दंतवैद्याच्या आॅफिसमधील मत्स्यालयात आणले जाते. मार्लिन हा आणखी एक मजेदार मासा असतो. तो नेमोचा वडील असतो. आपल्या मुलाच्या शोधात तो फिरत असतो. त्याचवेळी नेमो आणि इतर प्राणी मत्स्यालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतात. पुढे काय होते, हे चित्रपटातून पाहता येईल. मानवी मुलाइतके धोकादायक कोणी नसते. साध्या स्पर्श तुम्हाला मारु शकतो. मेन्स्ट्रोपोलिस या शहरात मॉन्स्टर्स राहत असतो. एका रात्री लहान मुलाला हा मॉन्स्टर्स त्रास देतो आणि त्यानंतर काय होते, हे या चित्रपटात दाखविले आहे.