4889_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 15:22 IST
उपवास हा नेहमीच धार्मिक धारणांवर आधारित नसतो. यामुळे वजन कमी होते असे नाही. उपवासामुळे शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपवास उपयोगी असतो, याबाबतची माहिती या ठिकाणी देत आहोत.
4889_article
उपवास हा नेहमीच धार्मिक धारणांवर आधारित नसतो. यामुळे वजन कमी होते असे नाही. उपवासामुळे शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपवास उपयोगी असतो, याबाबतची माहिती या ठिकाणी देत आहोत. उपवास हा ग्लुकोज आणि मेद कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. जेव्हा शरीरातील ग्लुकोज थांबविले जाते, त्यावेळी तुमच्या शरीरातील पेशी अत्यंत वेगवान होतात आणि शरीरातील मेद जाळण्याची प्रक्रिया सुरू होते. लेप्टीन असे संप्रेरक आहे, ज्यामुळे फॅट सेल्स लपविल्या जातात. शरीरात रोज कमी कॅलरीज निर्माण झाल्याने लेप्टीनची संवेदनशीलता कमी होते, यामुळे मेद कमी केले जाते. तुम्ही जर योग्य आहार घेतला नाही तर तुमचा उपवास काहीही उपयोगी होत नाही. उपवास जर तुम्ही मेद असणाºया पदार्थाने सोडला तर तुमचे वजन कमी होत नाही, उलट तुमचे वजन अधिक वाढते. उपवासामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपवास हा केमोथेरपी घेणाºया कॅन्सर रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. उपवास हा अधिकतर धार्मिक अंगाने केला जातो. तरीही तुमची पचनक्षमता वाढविण्यासाठी अधूनमधून उपवास करणे आवश्यक आहे. अभ्यासानुसार चयापचय क्रियेचा दर ३.६ ते १४ टक्क्यापर्यंत वाढतो. यामुळे तातडीने पचनक्रिया आणि तातडीने कॅलरीज जाळते.