4853_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 15:44 IST
तुमच्या इंटरनेटचे कनेक्शन खूपच सावकाश आहे. आयओएस आणि अँड्राईड दरम्यान तुम्हाला तुमची फाईल शेअर करायाचीय. चार्जिंगही कमी आहे, या नेहमीच्याच तक्रारी आहेत. आपल्याकडे असणारे गॅजेट्स कसे आहेत, त्यावर सातत्याने युवा पिढीमध्ये चर्चा सुरू असते. अशा वेळी नवी अशी कोणती गॅजेट्स आली आहेत, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.
4853_article
तुमच्या इंटरनेटचे कनेक्शन खूपच सावकाश आहे. आयओएस आणि अँड्राईड दरम्यान तुम्हाला तुमची फाईल शेअर करायाचीय. चार्जिंगही कमी आहे, या नेहमीच्याच तक्रारी आहेत. आपल्याकडे असणारे गॅजेट्स कसे आहेत, त्यावर सातत्याने युवा पिढीमध्ये चर्चा सुरू असते. अशा वेळी नवी अशी कोणती गॅजेट्स आली आहेत, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.प्रत्येकाच्या घरी असणाºया इंटरनेट कनेक्शनबाबत दोन प्रमुख तक्रारी असतात, वेग कमी असणे आणि वाय फाय कव्हरेज असून नसल्यासारखे. नेट कनेक्शन स्पीड कमी असेल तर तुमच्या कंपनीला वेगाने चालणाºया कनेक्शनबाबत सांगा. ब्रॉडबँडमध्ये सध्या ५० एमबीपीएसपर्यंत कनेक्शन मिळते, किंवा तुम्ही बहुविध इंटरनेट कनेक्शन घेऊ शकता. तुम्ही यासाठी http:www.speedify.com. वापरु शकता. या सॉफ्टवेअरद्वारा तुम्हाला वायफाय, डीएसएल आणि ३जी ४ जी कनेक्शन कसे वापरायचे हे सांगण्यात येते. यामध्ये १ जीबीचा डाटा प्रतिमहिना मोफत मिळतो. तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वायरलेस एक्सटेंडर वापरु शकता. टीपीलिंक, डीलिंक, नेटगार हे १,५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. बºयाच जणांकडे संगीताचा मोठा साठा असतो. आॅनलाईन स्त्रोताकडून गोळा केलेला साठाही असतो. बºयाचवेळा ऐकण्यासाठी स्पीकरची गरज असते. तुमच्या कॉम्प्युटरला अथवा फोन टॅब्लेटला ते जोडावे लागते. यासाठी तुम्ही ब्ल्यूटुथचा वापर करु शकता. तुमच्या फोनमध्ये ,टॅब्लेट अथवा लॅपटॉपमध्ये असणाºया ब्ल्यूटुथचा यासाठी वापर करता येतो. स्पीकरसाठी तुम्ही महागडे ब्ल्यूटुथ अडॉप्टर घेऊ शकता. सीएफएल ते एलईडीकडे प्रवास हा बºयाचवेळी सरकारने सांगितल्यामुळे झाला आहे. एलईडी बल्बमुळे मोठी बचत होते. त्याशिवाय ते अधिक काळ चालतेही. स्मार्ट एलईडी बल्बचा मग का वापर करु नये? आता तुमच्या फोनद्वारेही त्यावर नियंत्रण ठेवता येते (वायफाय ब्ल्यूटुथद्वारे) तुमच्याकडे आयओएस आणि अँड्रॉईड फोन असतील तर फाईल्स कशा शेअर करायच्या हा प्रश्न पडलेला असतो. हा अनुभव खूपच त्रासदायक आहे. आता यासाठी सोपा उपाय आला आहे. सँडडिस्क वायरलेस कनेक्ट स्टीकद्वारे हा प्रश्न सुटू शकतो. युएसबी फ्लॅश ड्राईव्हप्रमाणे हे काम करतो. कॉम्प्युटरद्वारे तुम्ही कोणतीही फाईल पाठवू शकता. यासाठी मोफत अॅपही मिळते. तुमचे फोटो आणि व्हिडिओ छोट्या पडद्यावर पाहता येत नाहीत. अँड्रॉईड फोन्सना मोठ्या पडद्यावर पाहणे आता शक्य आहे. तुमच्याकडे एचडीएमआय किंवा एमएचएल आहे का? तुम्ही एचडीएमआय किंवा एमएचएल अॅडॉप्टर विकत घ्या. ५०० रुपयांपर्यंत हे मिळते. तुमच्याकडे नसेल तर एचडीएमआय केबल वेगळी घ्यावी लागते. याला आणखी एक पर्याय आहे मिराकास्ट. तुमचे पर्सनल गॅजेट्स (लॅपटॉप, फोन, टॅब्लेटस) हे अत्यंत महागडे असतात. त्याची किंमत जास्त आहे म्हणून नव्हे तर त्यामध्ये तुमचा असणारा डाटा यामुळे असते. लॅपटॉप, फोन, टॅब्लेट चोरीला जाणे म्हणजे खूपच त्रासदायक असते. यासाठी तुम्ही चोरीपासून सुरक्षित असणारे प्रे हे उपकरण उपयोगी पडते. तुमचे उपकरण शोधण्यासाठी याचा वापर होतो. विंडोज, ओएस एक्स, आयओएस किंवा अँड्रॉईडमध्ये वापरता येते.