Join us

4749_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 15:02 IST

‘बालिका वधु’ या प्रसिद्ध मालिकेतुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूचे गूढ दरदिवसाला वाढत आहे. असे म्हटले जात आहे की, प्रत्युषाने तिच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्त्या केली. मात्र तिच्या घरच्यांकडून ही आत्महत्त्या नसून, हत्या असल्याचा आरोप केल्याने या संपुर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्याचबरोबर प्रत्युषाच्या मृत्यूचे गूढ देखील वाढले आहे. परंतु टिव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्युषाप्रमाणे बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी वयातच या जगातुन निरोप घेतला असून, त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. त्याच्या मृत्यूचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्पष्ट असा खुलासा केला गेला नसल्याने ही आत्महत्त्या की हत्या असा प्रश्न कायम आहे.

‘बालिका वधु’ या प्रसिद्ध मालिकेतुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूचे गूढ दरदिवसाला वाढत आहे. असे म्हटले जात आहे की, प्रत्युषाने तिच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्त्या केली. मात्र तिच्या घरच्यांकडून ही आत्महत्त्या नसून, हत्या असल्याचा आरोप केल्याने या संपुर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्याचबरोबर प्रत्युषाच्या मृत्यूचे गूढ देखील वाढले आहे. परंतु टिव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्युषाप्रमाणे बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी वयातच या जगातुन निरोप घेतला असून, त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. त्याच्या मृत्यूचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्पष्ट असा खुलासा केला गेला नसल्याने ही आत्महत्त्या की हत्या असा प्रश्न कायम आहे. अभिनेत्री जिया खान हिचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. जियाने ‘निशब्द’ या चित्रपटातून महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलीवुडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर बºयाचशा चित्रपटात ती झळकली. मात्र पुढे ती आयुष्याच्या ‘अप-डाउन्स’ वळणावर अशी फसली की, तिला या जगाचा निरोप घ्यावा लागला. वयाच्या २५ व्या वर्षी जियाने आत्महत्त्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र ही हत्या की आत्महत्त्या याचा खुलासा अजुनही पोलीस करू शकली नाही.परवीन बॉबी पडद्यावर जेवढी बोल्ड आणि बिंदासपणे वागत होती, तेवढीच ती एकाकी जीवन जगत होती. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिची जवळीकता होती. मात्र तिच्या आयुष्यात असा कोणीच आला नाही, तो तिला अखेरपर्यंत साथ देवू शकेल. या एकटेपणामुळेच परवीन आयुष्यात पुर्णपणे खचून गेली होती. पडद्यावर तिच्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या परवीनने जगाचा असा निरोप घेतला की, कोणालाच याची भनक लागली नाही. २००५ मध्ये तिचा मुंबईस्थिती फ्लॅटमध्ये मृत्यू आढळून आला. लोकांना तिच्या मृत्यूची माहिती दोन दिवसानंतर समजली.दिव्या भारती अशी अभिनेत्री होती, जिने केवळ वयाच्या १९ व्या वर्षीच बॉलीवुडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. ९० च्या दशकात दिव्या नंबर एकची अभिनेत्री होती. मात्र ऐवढ्या कमी वयात तिच्या मृत्यूची बातमी हैराण करणारी होती. दिव्याचा मृत्यू ५ एप्रिल १९९३ मध्ये झाला. दिव्याच्या अचानक मृत्यूमुळे बरेचशे अंदाज लावले गेले. काहींनी याला आत्महत्त्या तर काहींनी यास अपघात असल्याचे सांगितले. तर काहींनी यास पती चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला यांना दोषी ठरविले होते. अखेर १९९८ मध्ये पोलिसांनी ही केस बंद केली.साउथमध्ये आपल्या ग्लॅमर्स आणि बोल्ड अंदाजाने संगळ्याची बोलती बंद करणाºया विजयलक्ष्मी ऊर्फ सिल्क स्मिताने इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. सिल्कच्या करीअरची सुरुवात खुपच छान होती, मात्र नंतर ती इंडस्ट्रीमधून बाहेर पडत गेली. निराशा आणि एकटेपणामुळे ती मृत अवस्थेत आढळून आली. पंख्याला गळफास घेवून तिने आत्महत्त्या केल्याचे बोलले जात होते. मात्र हा घातपात असल्याचाही सुर व्यक्त केला जात होता.