Join us

4747_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 14:55 IST

भारतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत असतात. अगदी तसेच त्याच्या स्थितीनुसार असते भारतामधील अशा शहरांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.

भारतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत असतात. अगदी तसेच त्याच्या स्थितीनुसार असते भारतामधील अशा शहरांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.नवी दिल्लीच्या या ओळखीबाबत काही आश्चर्य वाटावयास नको. या शहरात होत असलेल्या गरमागरम राजकीय चर्चा या नेहमीच उभरत्या राजकीय नेत्यांना आकर्षित करीत असतात. तुम्हाला नेता व्हायचे असेल तर या शहरात जा.बॉलीवूड जिथं जन्माला आलंय ते शहर म्हणजे मुंबई. या शहराला ‘स्वप्नांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा फुटपाथवर राहून अनेक जण या ठिकाणी अभिनेते झाले आहेत. अभिनेत्याची स्वप्ने पाहणाºया अशा हजारोना हे शहर दरवर्षी वाहून आणते. माहिती नाही कधी कोण सुपरस्टार होईल?जगभरातील तंत्रज्ञांना आकर्षित करणारे शहर म्हणून सिलीकॉन व्हॅलीकडे पाहिले जाते. भारतामध्ये जेव्हा तंत्रज्ञानाचे जाळे वाढले त्यावेळी अनेकांनी सिलीकॉन व्हॅलीकडे धाव घेतली. ज्यांना तिथे संधी मिळाली नाही ते बंगळुरुला आले.भारतामधील अनेक जण वैद्यकीय मदतीसाठी चेन्नईकडे धाव घेत असतात. या शहरात अनेक हॉस्पिटल्स आहेत, त्याशिवाय जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे तामिळनाडू हे मेडिकल टुरिझमसाठी प्रसिद्ध आहे.या शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. यामध्ये जादवपूर विद्यापीठ, प्रेसिडन्सी विद्यापीठ, सेंट झेव्हिअर्स कॉलेज यांचा समावेश आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे हे मध्यवर्ती केंद्र होते. अत्यंत हुशार आणि उत्साही विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ‘बंगाल आज जो विचार करतो, तो भारत उद्या विचार करतो’ असे गोखले यांनी म्हटले होते.गुजराती लोकांना पैशाचे महत्व माहिती असते. उद्योग क्षेत्रात गुजराती लोक नेहमी पुढे असतात. अनेक उद्योगात गुजराती लोकांनी पुढाकार घेतला आहे.नवी दिल्ली ही राजधानी आहे तर वाराणसी ही आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जगातील सर्वात जुन्या शहरांमध्ये याची ओळख आहे. भगवान शंकरांचे शहर म्हणूनही या शहरास ओळखले जाते.