4712_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 15:08 IST
खेळ म्हटले की अगदी ठराविक प्रकार आपल्यासमोर येतात. मात्र अगदी जवळून पाहिल्यास असे अनेक खेळ आहेत, जे आपणास माहिती नाहीत. ते पाहिल्यानंतर आपण म्हणू शकतो ‘अगदी आश्चर्यकारक’ किंवा ‘हे तर मला माहितीच नव्हते.’ जगातील अशाच काही अजब आणि विचित्र खेळाच्या प्रकाराची या ठिकाणी माहिती देत आहोत, जे अत्यंत मजेदार आणि औत्सुक्याचे आहेत.
4712_article
खेळ म्हटले की अगदी ठराविक प्रकार आपल्यासमोर येतात. मात्र अगदी जवळून पाहिल्यास असे अनेक खेळ आहेत, जे आपणास माहिती नाहीत. ते पाहिल्यानंतर आपण म्हणू शकतो ‘अगदी आश्चर्यकारक’ किंवा ‘हे तर मला माहितीच नव्हते.’ जगातील अशाच काही अजब आणि विचित्र खेळाच्या प्रकाराची या ठिकाणी माहिती देत आहोत, जे अत्यंत मजेदार आणि औत्सुक्याचे आहेत.जगभरात खेळला जाणार हा अत्यंत विनोदी प्रकारचा खेळ आहे. तुम्ही अशा प्रकारचा खेळ असू शकतो हे मनात देखील आणू शकत नाही. अर्थात हा पुरुषांशी संबंधित खेळ आहे. अगदी दोन मिनिटांचा हा खेळ आहे. तुमची पँट घोट्याजवळ इतकी घट्ट बांधा की त्यातून काहीही जाऊ शकणार नाही. त्यात दोन पिल सोडा. जे अधिक काळ ही पिले ठेवेल तो जिंकेल. ऐकून विचित्र वाटते नाही. १९८१ साली एकाने ५ तास ३० मिनिटांचा विक्रम केला आहे. जगभरातील सर्वात वेगवान खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिले जाते. यात दिवसेंदिवस वाढ होते आहे. आंधळा फुटबॉल असा खेळ आहे, ज्यामध्ये दिव्यांग लोक बाहेर निघून त्यात सहभागी होतात. हा खेळ फुटबॉलच्या इतर खेळाप्रमाणेच आहे. खेळाडूंच्या डोळ्यावर पट्टी असते. खाद्य पदार्थ हे खेळांमधील प्रमुख घटक आहेत. गेल्या हजारो वर्षांपासून याचा संबंध आहे. चीज रोलिंग हा २०० वर्षापासूनचा खेळ आहे. इंग्लंडमध्ये सुट्यांच्या काळात लोक कुपर्स हिलच्या वरच्या भागात जमतात. हा चीज रोल खाली टाकतात. लोक त्याला पकडण्यासाठी वरुन खाली येत धडपड करीत असतात. यातील जिंकणाºयास यातील पनीर मिळते सोबत शरीराचा काही भाग सोलवटून निघतो, काहींची हाडेही मोडतात. मेंदू आणि ताकद यांचा एकत्रित खेळ म्हणजे चेस बॉक्सिंग. यात सहभागी होणाºयास बुद्धिबळ आणि बॉक्सिंग हे दोन्ही खेळ खेळता आले पाहिजेत. बॉक्सिंग करुन मधल्या काळात बुद्धिबळ खेळतात. अनेकांना हा खेळ आवडतो कारण यातमध्ये क्रुरता नाही किंवा बुद्धिबळमधील हळुवार चालीही नाहीत. सर्वात जुन्या आणि विचित्र खेळापैकी हा एक खेळ आहे. स्कॉटलंडमधील श्वास रोखणारा हा खेळ. मोठा लाकडी खांब काही अंतरावर उचलून फेकायचा हा खेळ आहे. हा लाकडी ठोकळा प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर फेकायचा. याच चित्र पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की यामध्ये खेळाडूंना ड्रेस परिधान करावा लागतो. विनोदी विचित्र खेळामधील आणखी एक खेळ. घोड्यावरुन बसून पोलो खेळताना आपण पाहतो. घोड्याच्या ठिकाणी एकचाकी सायकल असते. हा अत्यंत अवघड खेळ आहे. प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टमध्ये चेंडू मारायचा असतो. सायकलचे संतुलन सांभाळत लाकडी स्टीकने हा खेळ खेळतात.