Join us

4517_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 15:20 IST

भारत देश हा अद्भूत आहे. जवळपास प्रत्येकाला महात्मा गांधी यांच्या महानतेविषयी त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाच्या स्थानाविषयी माहिती असते. तथापि भारतीय कबड्डी संघाविषयी अथवा राजा महेंद्र प्रतापसिंग यांच्याबाबत विचारले असता सर्वांनाच माहिती असेल नाही. आम्ही अशाच काही माहिती नसलेल्या गोष्टींची ओळख करुन देत आहोत.

भारत देश हा अद्भूत आहे. जवळपास प्रत्येकाला महात्मा गांधी यांच्या महानतेविषयी त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाच्या स्थानाविषयी माहिती असते. तथापि भारतीय कबड्डी संघाविषयी अथवा राजा महेंद्र प्रतापसिंग यांच्याबाबत विचारले असता सर्वांनाच माहिती असेल नाही. आम्ही अशाच काही माहिती नसलेल्या गोष्टींची ओळख करुन देत आहोत. कदाचित तुम्हाला ‘लगान’ चित्रपटातील आमीर खानविषयी ही माहिती असल्याचे वाटत असेल. आम्ही या ठिकाणी गुगल मॅप्सविषयीच्या उत्तराबाबत सांगत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, भारतामधील ३०० प्रमुख शहरांपेक्षा इस्त्रो भुवनाची लाखो सॅटेलाईट छायाचित्रे आहेत. या ठिकाणची ३ डी छायाचित्रे आणि काही गंमतीशीर माहितीही उपलब्ध आहे.रवींदर कौशिक हे भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेचे सदस्य होते, जे पाकिस्तानमध्ये ८ वर्षे होते. तथापि पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थांनी त्यांना पकडले. भारतीय गुप्तचर संस्थेच्या चुकीमुळेच त्यांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. फुफ्फुसाच्या क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला. सलमान खानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट कौशिक यांच्या जीवनावर आधारित होता.भारतीय निवडणूक आयोगाने गुजरातमधील गिरच्या जंगलात केवळ एका माणसासाठी म्हणजे महंत भारत दर्शनदास यांच्यासाठी निवडणूक केंद्र स्थापन केले होते. दर्शनदास हे भारतासाठी सर्वात महत्वाचे मतदार असल्याचे म्हटले जाते.भारतीय पुरुष आणि महिला संघाने आतापर्यंतचे कबड्डीच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्व सुवर्णपदके जिंकली आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित आपण क्रिकेटवर अधिक प्रेम करीत असल्याने माहिती नसावे.स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक आणि मार्क्सवादी क्रांतीकारी कार्यकर्ते राजा महेंद्रप्रताप सिंग यांच्याविषयी बºयाच जणांना माहिती नसावी. जन्माने जाट राजपुत्र असणारे बहुलतावादी, सहिष्णुतावादी, उदारमतवादी आणि निधर्मी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी नवीन धर्म अर्थात प्रेम धर्माची स्थापना केली. ज्यामध्ये केवळ प्रेमाला महत्व आहे. नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले होते. त्यांच्यावर पोस्टाचे तिकीटही काढण्यात आले आहे.बांगला देशाच्या मुक्तीप्रसंगी सर्वोच्च कामगिरी बजावणारे ज्यू अधिकारी म्हणून लेफ्टनंट जनरल जेकब फर्ज राफेल जेकब यांची ओळख आहे. आत्मसमर्पण न केल्यास भारतीय वायूदल पाकिस्तानी सैन्यावर बॉम्बहल्ले करेल अशी त्यांनी धमकी दिली. विशेष म्हणजे असे करण्याचा भारताचा कोणताही इरादा नव्हता. पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल ए. ए. के. नियाझी यांनी ही धमकी ऐकृून केवळ ३० मिनिटात आत्मसमर्पण केले. यामुळे हजारो भारतीय सैनिकांचे प्राण वाचले.बºयाच वेळा भारतीय सेनादलाच्या क्षमतेविषयी शंका घेतली जाते. यामागचे आणखी एक कारण म्हणजे भारतीय सेना ही शांतताप्रिय आहे. भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी सेना आहे. त्याशिवाय जगातील सर्वात मोठी जंगलातील युद्धात तरबेज मानली जाते. जगभरातील कोणत्याही ठिकाणी संयुक्त राष्टÑाने पाठविल्यानंतर शांतीसेना म्हणून काम केले आहे. त्याशिवाय घोडदळातील निष्णात म्हणून सेनेकडे पाहिले जाते. सियाचिन ग्लेसियर या जगातील सर्वोच्च स्थानाचे संरक्षण करणारी ही सशस्त्र सेना आहे.बॉलीवूड हे भारतीय चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधीत्व करते असा तुमचा अंदाज असेल तर ते चूक आहे. बरेच चित्रपट हे बॉलीवूड बाहेर तयार होतात. टॉलीवूड (तमीळ आणि तेलुगु) मध्ये बॉलीवूडपेक्षाही अधिक चित्रपट तयार होतात.