40 साल बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 02:02 IST
बॉलिवूडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला शोले हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक पहिला जाणारा चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत आजही अनेक किस्से ...
40 साल बाद
बॉलिवूडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला शोले हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक पहिला जाणारा चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत आजही अनेक किस्से सांगितले जातात. शोलेची टीम एकत्र पहाता यावी हे अनेकांचे स्वप्न आहे. शोले चित्रपटातील कलावंत अमिताभ बच्चन, धमेंद्र, हेमा मालिनी व जया बच्चन सुमारे 40 वर्षांनंतर एकाच मंचावर आले. या कलावंतांनी ‘शोले’च्या आठवणींना उजाळा दिला. शोले चित्रपटापासून सुरू झालेली दोस्ती कायम असल्याचे यावेळी मंचावरून जाहीर करण्यात आले.