Join us

3865_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:39 IST

प्रत्येक दिवशी नवे गॅजेट बाजारात येते. नवे गॅजेट काही दिवसांतच जुने होऊन जाते. अशा जुन्यांची जागा घेण्यासाठी नवे गॅजेटस् तयारच असतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते नवे गॅजेटस् आपण वापरत असतो. विज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत चालले आहे. त्यामुळे कोणतीही नवी वस्तू अथवा गोष्ट काही दिवसांमध्येच जुनी होऊन जाते. अशाच काही जुन्या झालेल्या गॅजेटस्विषयी माहिती देत आहोत...

प्रत्येक दिवशी नवे गॅजेट बाजारात येते. नवे गॅजेट काही दिवसांतच जुने होऊन जाते. अशा जुन्यांची जागा घेण्यासाठी नवे गॅजेटस् तयारच असतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते नवे गॅजेटस् आपण वापरत असतो. विज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत चालले आहे. त्यामुळे कोणतीही नवी वस्तू अथवा गोष्ट काही दिवसांमध्येच जुनी होऊन जाते. अशाच काही जुन्या झालेल्या गॅजेटस्विषयी माहिती देत आहोत...पॅनासोनिक आणि सिनक्लेअर रिसर्चने पोर्टेबल टी. व्ही. बाजारात आणला. त्यानंतर सोनी या कंपनीने नवीन उपकरण आणून या बाजारात उडी घेतली. पडद्याचा आकार ३ ते ६ इंच इतका होता. ७० आणि ८० च्या दशकात हे बाजारात उपलब्ध होते. मात्र ते कधीच प्रसिद्ध झाले नाहीत. ते अजूनही दिसून येतात.डिजीटल कॅमेºयाच्या युगापूर्वी आणि मोबाईलमध्ये कॅमेरा येण्यापूर्वी फिल्म कॅमेºयावर काम केले जाई. सध्यापेक्षाही अधिक प्रयोग त्यावेळी केले जात होते. त्यावेळी फोटो चुकीचा आला आहे किंवा काढून टाका अशी फारशी पद्धत नव्हती. ही फिल्म कॅमेºयात बसविली जाई. यात केवळ ३६ छायाचित्रे काढली जाऊ शकत होती.हातातील घड्याळात कॅलक्युलेटर असावे अशी एकेकाळी क्रेझ होती. त्याचा आवाजही यायचा. त्यामुळे लहान मुलांपासून सर्वांना ते हवेहवेसे वाटायचे. अशा डिजीटल घडाळ्याच्या आणि कॅलक्युलेटरच्या निर्मितीत कॅसिओ ही कंपनी प्रमुख होती. ७० आणि ८० च्या दशकात अशी घड्याळे लोकप्रिय होती. सध्याच्या काळात ही घड्याळे अडगळीला पडली आहेत.इलेक्ट्रॉनिक आॅर्गनायझर हा छोट्या आकाराचा संगणक होता. ते फोल्ड करता येत होते, त्यामुळे छोट्याशा लॅपटॉपसारखे दिसत होते. इलेक्ट्रॉनिक पर्सनल डायरी म्हणूनही याचा वापर करता यायचा. कॅलेंडर, अ‍ॅड्रेस बुक असाही वापर करता यायचा. ९० च्या दशकात याचा वापर होत होता. २००० साली पीडीएने याची जागा घेतली.सध्याच्या पीएसपीची ९० च्या दशकातील आवृत्ती म्हणजे निन्टेन्डो बॉय. १९८९ साली हे बाजारात आले. व्हिडिओ गेम गॅजेट म्हणून द गेम बॉय प्रसिद्ध होते. यामध्ये विविध प्रकारच्या गेमचा समावेश होता. टेट्रीस, सुपर मारिओ, बेसबॉल आणि टेनिस हे खेळ खेळता येते.७० च्या दशकात पेजरचा वापर केला जायचा. त्याला बीपर्स असेही म्हटले जायचे. ८० आणि ९० च्या काळात याची लोकप्रियता कायम होती. मोटोराला ही कंपनी यात आघाडीवर होती. मेसेजेसचे आदानप्रदान करण्यासाठी याचा वापर होत होता.संगणकात साठवणूक करणारे उपकरण म्हणून फ्लॉपी डिस्कची ओळख होती. याचा आकार २ ते ८ इंच इतका होता. साधारण आकार ३.५ इंच इतका होती. फ्लॉपी डिस्क १.४४ एम. बी. इतकी होती. आता याचा खूपच कमी वापर होतो. मोठ्या आकाराचे साठवणूक करणारी उपकरणे आता आली आहेत.