3846_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 04:10 IST
कोणताही सेलिब्रिटी प्रसिद्धीस येण्यापूर्वी काय होता, हे ओळखणे कठीण असते. पण एक वेळ अशी होती, ज्यावेळी ते सर्वसामान्यांप्रमाणे होते. शाळेत असताना ते अगदी चीअरलीडर्स म्हणजे आरडाओरडा करणारे होते.
3846_article
कोणताही सेलिब्रिटी प्रसिद्धीस येण्यापूर्वी काय होता, हे ओळखणे कठीण असते. पण एक वेळ अशी होती, ज्यावेळी ते सर्वसामान्यांप्रमाणे होते. शाळेत असताना ते अगदी चीअरलीडर्स म्हणजे आरडाओरडा करणारे होते.अत्यंत आकर्षक, हॉट आणि सेक्सी बॉम्बशेल म्हणून जिचा उल्लेख होतो, ती मेगन फॉक्स ही ब्रियान आॅस्टीन ग्रीनसोबत लग्न करणार आहे. हॉलीवूडची विख्यात अभिनेत्री होण्यापूर्वी ती एक साधी मुलगी होती. पोर्ट सेन्ट लुसी येथील मॉर्निंगसाईड अकॅडमी या शाळेत असताना चीअरलिडींग टीमची सदस्या होती. जगातील १०० सुंदर आणि प्रभावशाली महिलांमध्ये समावेश असलेली जेनिफर लॉरेन्स ही आपल्या मित्रांमध्ये जेन या नावाने ओळखली जाते. वयाच्या १४ व्या वर्षापासून तिला या नावाने हाक मारली जाते. जेनिफर अभिनेत्री होण्यापूर्वी चीअर लिडींगमध्ये सहभागी होती. हॉकी, सॉफ्टबॉल, मॉडेलिंग हे तिचे छंद आहेत. गायिका, गीतकार, अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, उद्योजिका आणि समाजसेविका म्हणून मॅडोनाची ओळख आहे. आवाजासोबतच्या तिच्या नृत्याचे अनेक जण चाहते आहेत. स्टेजवर ती अगदी चपळ असते. यापैकी काही पदलालित्य तिचे स्वत:चे आहेत तर काही तिने चीअरलिडींग करताना शिकून घेतलेले आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठात शिकत असताना ती चिअरलिडींगचे काम करायची. ब्युटी क्विनची भूमिका करणारी म्हणून अॅलिसिया सिल्व्हरस्टोनचे नाव घेतले जाते. हॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी ती चीअरलीडर म्हणून काम करीत होती. ही विख्यात अभिनेत्री चीअरलीडर होती, हे खरे वाटते का? डल्लास काऊबॉय स्टार टोनी रोमो हिच्यासोबत डेटवर जाण्यापूर्वी ती फुटबॉल खेळाची चीअरलीडर होती. टेक्सासमधील रिचर्डसन नॉर्थ ज्युनिअर हायस्कूलमध्ये तिने चीअरलीडरचे काम केले आहे. हॉलीवूडस्टार लिंडसे लोहान हिने लहानपणी चाईल्ड फॅशन मॉडेल म्हणून वयाच्या तिसºया वर्षापासून कामाला सुरुवात केली. हॉलीवूड स्टार होण्यापूर्वी ती चीअरलीडर होती.