3831_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:32 IST
अलीकडे बॉलिवूडमध्ये चरित्र वा पुस्तके लिहिण्याचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील आपल्या करिअरमधील विनोदी प्रसंग, अथक संघर्ष आणि त्यानंतरचे चाखलेली यशाची चव, असे काय लिहू नि काय नको, असे अनेक बॉलिवूड दिग्गजांना झाले आहे. पण आता जमाना आहे तो स्मार्टफोनचा. अशास्थितीत बॉलिवूडमधील काही स्टार्सनी स्वत:चे अॅप तयार केले तर काय धम्माल होईल, होय ना? काही आघाडीच्या स्टार्सनी स्वत:चे अॅप काढले तर ती कशाला डेलिकेटेड असेल, कल्पना करूयात!
3831_article
अलीकडे बॉलिवूडमध्ये चरित्र वा पुस्तके लिहिण्याचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील आपल्या करिअरमधील विनोदी प्रसंग, अथक संघर्ष आणि त्यानंतरचे चाखलेली यशाची चव, असे काय लिहू नि काय नको, असे अनेक बॉलिवूड दिग्गजांना झाले आहे. पण आता जमाना आहे तो स्मार्टफोनचा. अशास्थितीत बॉलिवूडमधील काही स्टार्सनी स्वत:चे अॅप तयार केले तर काय धम्माल होईल, होय ना? काही आघाडीच्या स्टार्सनी स्वत:चे अॅप काढले तर ती कशाला डेलिकेटेड असेल, कल्पना करूयात!करिना कपूरने स्वत:चे अॅप काढले तर निश्चितपणे बेबो यावर पॉऊटींगची कला शिकवेल. करिना कपूरप्रमाणे कुणीही पाऊट्स करू शकत नाही. सेल्फी विथ पॉऊट्स शिकवणारी करिनाची अॅप निश्चितपणे सर्वाधिक डाऊनलोड होणारी अॅप असेल, यात शंका नाही. प्रियंकाने स्वत:ची अॅप काढलीच तर ती सतत विदेशवारी करणाºया लोकांसाठी असेल. सध्या प्रियंकाचा एक पाय देशात आणि एक पाय विदेशात आहे. तिने अॅप काढलीच तर ती भारतीयांना ‘जेटलाग’वर कशी मात करायची ते शिकवेल.अलीकडे एका मुलाखतीत पिग्गीने विमानात झोप कशी घेता येईल, याच्या टीप्स दिल्या होत्या. सलमान खानने स्वत:ची अॅप काढलीत तर निश्चितपणे ती लोकांना फिटनेट टीप्स देण्यासाठी असेल. ओ ओ जाने जाना...म्हणत आपली टोन्ड बॉडी दाखवत शर्टलेस झालेला सल्लू तरूणाईत जाम लोकप्रीय आहे. साहजिकच त्याच्याकडून फिटनेट टीप्स घेण्यासाठी झुंबड उडेल. परफेक्शननिस्ट आमीर खानने स्वत:ची अॅप आणल्यास तो निश्चितपणे ‘पब्लिसिटी’चे वेगवेगळे फंडे लोकांना देईल. सध्या चित्रपटांसाठी पब्लिसिटी, प्रचार महत्त्वाचा झाला आहे. यातही पब्लिसिटीसाठी आमीरच्या डोक्यातून निघणाºया नवनव्या कल्पनांना तोड नाही. त्यामुळेच त्याने स्वत:ची अॅप आणली तर निश्चितपणे तो त्यावरून पब्लिसिटीसाठीच्या वेगवेगळ्या कल्पना सांगेल. रणवीर सिंह म्हणजे अजब गजब फॅशन स्टाईल. रणवीरची मोबाईल अॅप शंभर टक्के फॅशनला वाहिलेली असेल. प्रिंटेड जॅकेट पासून फेडोरासपर्यंत काहीही मनाला वाट्टेल ते करा आणि मिरवा, हेच रणवीरने लोकांच्या गळी उतरवले असते. बॉलिवूडमध्ये प्रारंभी करावा लागला होता संघर्ष, ब्रेकअप आणि यानंतर डिपे्रशन अशा सर्व प्रसंगातून गेलेल्या दीपिकाने याऊपरही बॉलिवूडमध्ये नंबर १ चा पल्ला गाठला. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या अनेक पुरस्कारांवर तिने आपले नाव कोरले. दीपिकाने अॅप काढली तर ती पहिला क्रमांक कसा गाठायचा आणि तो कसा टिकवून ठेवायचा, निश्चितपणे याचेचे धडे ती देईल.