Join us

3813_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:42 IST

बॉलिवूडमध्ये अधूनमधून ब्रेकअप-लिंकअपच्या बातम्या येत असतात. मात्र, त्यामध्ये किती खऱ्या आणि किती अफवा असतात हे सांगणे कठिण आहे. असे असले तरी अशा बातम्यांमुळे चर्चेला उधाण येतेच. अशाच टॉप ५ शॉकिंग अफेयर्सबद्दल आज तुम्हाला सांगत आहोत.

बॉलिवूडमध्ये अधूनमधून ब्रेकअप-लिंकअपच्या बातम्या येत असतात. मात्र, त्यामध्ये किती खऱ्या आणि किती अफवा असतात हे सांगणे कठिण आहे. असे असले तरी अशा बातम्यांमुळे चर्चेला उधाण येतेच. अशाच टॉप ५ शॉकिंग अफेयर्सबद्दल आज तुम्हाला सांगत आहोत.या लिस्टमध्ये हृतिकचा दोनदा नाव वाचून आश्चर्य वाटले ना? ‘काईट्स’ चित्रपटाच्या वेळी स्पॅनिश ब्युटी बार्बरा मोरी आणि हृतिकच्या सिझलिंग केमिस्ट्री विषयी अनेक रंजक आणि खुसखुशीत बातम्यांनी चांगलेच मनोरंजन केले होते.जॉन अब्राहमशी नाते तुटल्यानंतर बिपाशाला राणा दग्गुबातीने आधार दिला होता. ‘दम मारो दम’च्या चित्रिकरणाच्या वेळी दोघांचे सुत जुळले अशी बातमी होती. मात्र, दोघांनी त्वरीत याला नकार देत या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले.अर्जुन कपूर आणि रणवीर सिंगचा दोस्ताना तर पूर्ण बॉलिवूडमध्ये पसिद्ध आहे. मात्र, रणवीरसोबत बे्रक-अप झाल्यानंतर अनुष्का शर्मा आणि अर्जुनच्या बोली-भेटी वाढल्याची चर्चा होती. पण अखेर ती अफवाच निघाली.किंग खान शाहरुख आणि ‘देसीगर्ल’ प्रियंकाच्या अफेयरच्या बातमीने बी-टाऊनमध्ये चांगलीच खळबळ माजवली होती. दोघे केवळ डेटिंगच नाही तर त्यांचे गुपचूप लग्नही झाले आहे,अशी बातमी आली होती.हृतिकचा सुखीसंसार तोडण्यामागे कंगणा रणावत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. 'क्रिश-३'च्या सेटवर दोघांमध्ये जवळीकता वाढली होती आणि दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकाणार आहेत अशी मध्यंतरी अफवा उडाली होती.