3811_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:44 IST
गेल्या वर्षी अनेक दर्जेदार चित्रपट पाहायला मिळाले. बजरंगी भाईजान, पिकू, बाजीराव मस्तानी, तनू वेड्स मनू रिटर्न्स अशी काही त्यामध्ये नावे घेता येतील. २०१६मध्ये सुद्धा बॉलिवूडमध्ये मोठे सरप्राईजेस आहेत. सलमान, आमिर आणि शाहरुख बरोबरच साऊथच्या चित्रपटाचीही प्रेक्षक आतूरतेने वाटत पाहत आहेत.
3811_article
गेल्या वर्षी अनेक दर्जेदार चित्रपट पाहायला मिळाले. बजरंगी भाईजान, पिकू, बाजीराव मस्तानी, तनू वेड्स मनू रिटर्न्स अशी काही त्यामध्ये नावे घेता येतील. २०१६मध्ये सुद्धा बॉलिवूडमध्ये मोठे सरप्राईजेस आहेत. सलमान, आमिर आणि शाहरुख बरोबरच साऊथच्या चित्रपटाचीही प्रेक्षक आतूरतेने वाटत पाहत आहेत.रणबीर - कॅट अभिनित ‘जग्गा जासूस’ त्याच्या घोषणेपासून चर्चेत आहे. तरुण डिटेक्टिव्ह आपल्या वडिलांचा शोध घेतो अशी चित्रपटाची कथा आहे. खूप महिन्यांच्या विलंबानंतर येत्या जून महिन्यात जग्गा जासूस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट म्हणून ‘बाहूबली’ने नावलौकिक मिळवला. कट्टप्पाने बाहूबलीला का बरे मारले असावे हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण या दुसऱ्या भागाची आतूरतेने वाट पाहत आहेत. प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरली नसली तरी यावर्षीच तो रिलिज होणार आहे. शाहरुख खान यामध्ये स्वत:च्याच फॅनची भूमिका साकारत असून आतापर्यंत पाहिलेल्या प्रोमोजवरून हा काही तरी भन्नाट सिनेमा असणार यात काही शंका नाही. 15 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ऐतिहासिक चित्रपटसांठी प्रसिद्ध असलेला आशुतोष गोवारिकर हृतिक रोशनसोबत पुन्हा एकदा चित्रपट बनवणार आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच. दोन-अडिच हजार वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या परिसरात उदयास आलेल्या हडप्पा संस्कृतीची कथा मोहेंजदरोमध्ये पाहायला मिळणार आहे. 12 आॅगस्ट रोजी सिनेमा रिलिज होणार आहे. ऐंशीच्या दशकातील गुजरातवर आधारित या चित्रपटातील शाहरुखच लूक पाहूनच त्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. नवाजुद्दीन सिदिकी आणि पाकिस्ताना नवअभिनेत्री महिरा खान यामध्ये दिसणार आहेत. 3 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.