Join us  

२१ वर्षांची झाली शाहरूख खानची लेक सुहाना, आई गौरी खानने फोटो शेअर करत केलं बर्थडे विश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:59 AM

आज सुहानाचा वाढदिवस असून तिची आई गौरी खानने सोशल मीडियावर सुहानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नसले तरी फॅन फॉलोव्हिंगच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देते. सुहाना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सुहानाने सोशल मीडियावर आपले फोटो नेहमीच पोस्ट करत असते. चाहत्यांना तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावदेखील करत असतात. आज सुहानाचा वाढदिवस असून तिची आई गौरी खानने सोशल मीडियावर सुहानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गौरी खानने शेअर केलेल्या फोटोत सुहाना एका खुर्चीवर बसलेली दिसते आहे. तिने पोलका डॉट ड्रेस परिधान केलाय. फोटो शेअर करू गौरीने लिहिले की, तुझ्यावर आज..उद्या आणि कायमच प्रेम राहील. तर गौरीच्या या पोस्टवर सुहानाने देखील आय लव्ह यू अशी कमेंट केलीय. 

गौरीच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कमेंट करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नीलम कोठारीने कमेंट करत म्हंटलंय, “हॅपीएस्ट बर्थडे डार्लिंग सुहाना”. तर नीलमसोबतच सीमा खान, भावना पांडे, संजय कपूर अशा अनेक सेलेब्सनी सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सुहाना खान सध्या न्यू यॉर्कमध्ये फिल्म मेकिंग आणि अभिनयाचे धडे गिरविते आहे. शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

२०१८ मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इच्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानगौरी खान