अभिनयाने प्रेक्षकांना मोहिनी घालणारे बॉलीवूडचे अनेक नायक-नायिका आता संगीत क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहेत. एखाददुसऱ्या नव्हे तर बऱ्याच स्टार्सना गायनाचे डोहाळे लागले आहेत. आगामी ‘हीरो’ या चित्रपटात सलमान खानने गाणे गायले आहे. हे गाणे सध्या तरुणाईच्या विश्वात माहोल करीत आहे. सलमानला गायकाच्या या नव्या भूमिकेत पसंत केले जात आहे. सलमानच्या आधीही अनेकांनी आपल्या गोड गळ्याचा परिचय प्रेक्षकांना घडवला आहे. ‘हायवे’ चित्रपटात आलिने ‘सूहा साहा...’ हे गीत गायले होते. गायनाचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्यावर तिने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटासाठी गायलेले ‘मै तेनू समझावा की...’ हे गीत अतिशय लोकप्रिय ठरले. आजही अनेकांच्या तोंडी हे गीत ऐकायला मिळते. संगीत क्षेत्रातील मान्यवरांनीही या गाण्याचे आणि तिच्या आवाजाचेही कौतुक केले होते. कमल हसन-सारिकाची गुणी मुलगी अभिनेत्री श्रुती हसनही या गायनाच्या क्षेत्रात मोठे नाव करीत आहे. किंबहुना तिला गायिकाच म्हणावे इतकी गाणी तिने गायली आहेत. श्रुतीने आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांसाठी अनेकदा प्लेबॅक केले आहे.प्रियांका चोप्रा प्रियांकाच्या गाण्यांचे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन अल्बम लॉन्च झाले असून त्यातील अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत.श्रद्धा ही तिच्या ‘रॉक आॅन २’ या चित्रपटात गाणार अशी चर्चा आहे. तर कधी तिच्यासाठी तिची आई गाणार असल्याचेही ऐकायला मिळते. यापूर्वी तिने ‘एक व्हिलन’ चित्रपटासाठी ‘तेरी गलियां मुझको भावें...’ हे गीत गायले होते.जॉनही गाणार?नायिकांबरोबरच बॉलीवूडचे नायकही गायन क्षेत्रात आपली चमक दाखविण्यात मागे नाहीत. अॅक्शन आणि रोमँटिक हीरो म्हणून ओळख असलेला अभिनेता जॉन अब्राहमही गाणार असल्याची चर्चा आहे. फरहान अख्तर, अक्षय कुमार आणि सलमान खानपाठोपाठ जॉनही आपल्या आवाजाने त्याच्या चाहत्यांना भुरळ पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी ‘वेलकम बॅक’ चित्रपटात जॉनने एक गाणे गायले आहे. जॉनचा हा सूर कितपत लागेल हे लवकरच कळेल.
बॉलीवूड स्टार्सना गाण्याची आवड
By admin | Updated: August 21, 2015 08:57 IST