शीना बोराची मर्डर केस सध्या गाजत आहे. हे प्रकरण इतके गुंतागुंतीचे आहे की यावर पुढे नक्की एखादा चित्रपट येईल, अशी चर्चाही रंगायला लागली आहे. तो चित्रपट यायचा तेव्हा येवो पण एक योगायोग असा की दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘अब रात गुजरनेवाली है’ या चित्रपटाची कथा अगदी या प्रकरणाशी सुसंगत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ही कथा मे महिन्यामध्येच लिहिली आहे. याशिवाय आरुषी हत्याकांडावर आधारित ‘रहस्य’ या चित्रपटाचीही चर्चा सुरूच आहे. अशा गुन्हेगारी घटनांवर बॉलीवूडमध्ये यापूर्वीही चित्रपट आले आहेत. काही गाजले तर काही अगदी थंड्या बस्त्यात गेले. अशाच काही चित्रपटांविषयी...रहस्य : दिल्लीतील आरुषी तलवार हिच्या हत्येवर मनीष गुप्ताचा ‘रहस्य’ हा चित्रपट आला होता. तलवार परिवाराने या चित्रपटाला विरोध केला होता. अर्थात राष्ट्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने या दोन्ही चित्रपटांमध्ये साम्य नसल्याचे सांगून परवानगी दिली होती.तलवार : मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘तलवार’ हा चित्रपट २ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होतो आहे. २००८ साली नोएडा येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडावर आधारित हा चित्रपट आहे. १४ वर्षीय मुलगी आरुषी तलवार आणि घरातील नोकर यांचा खून करण्यात आला होता. याबाबत आरुषीचे वडील राजेश आणि आई नुपूर यांना अटक करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, तब्बू यांच्या भूमिका आहेत. नीरज ग्रोव्हर मर्डर केसप्रकरणी २००८ साली राम गोपाल वर्मा यांनी ‘नॉट अ लव्ह स्टोरी’ हा चित्रपट निर्माण केला होता. या चित्रपटाबाबतही नीरजच्या नातेवाइकांनी आक्षेप घेतला होता. माही गिलने या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती.दिल्लीत राहणारी मुलगी दीपिका हिच्यावर काढण्यात आलेल्या एमएमएसवर आधारित हा चित्रपट होता. सनी लिआॅनही या चित्रपटात होती. त्यामुळे हा चित्रपट गाजला. रागिनी एमएमएसचा हा सिक्वेल होता.आंध्र प्रदेशमधील राजनेता परीटला रवींद्र याच्यावर आधारित हा चित्रपट होता. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हिंदी आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट काढण्यात आला होता. विवेक ओबेरॉय चित्रपटात हीरो होता.जेसिका लाल मर्डर प्रकरणावर ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपट बनविण्यात आला. जेसिकाच्या परिवारानेही हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली होती. परंतु तो पडद्यावर झळकलाच.
गुन्हेगारी घटनांवरील बॉलीवूडचे चित्रपट
By admin | Updated: September 3, 2015 03:35 IST