Join us  

एका जाहिरातीमुळे फळफळलं नशीब, सलमानसोबत काम करून बनली स्टार; सध्या काय करते 'सनम बेवफा' फेम अ‍ॅक्ट्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 3:50 PM

बॉलिवूडच्या दबंग खानसोबत लीड रोल करत ही अभिनेत्री रातोरात स्टार झाली.

Samnam bewafa fame Navodita sharma : अभिनेता सलमान खानसोबत 'सनम बेवफा' या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील तिने निभावलेली चांदणीची भूमिका विशेष गाजली. हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर काही नायिका प्रकाशझोतात आल्या. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी सलमान खानसोबत 'सनम बेवफा' चित्रपटात दिसली होती. 

साधारणत: ३० वर्षांपूर्वी भाईजानसोबत नवोदिता शर्माने हिंदी सिनेसृष्टीत डेब्यू केला. या सिनेमाने अभिनेत्रीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. सलमानसोबत झळकली आणि नवोदिता रातोरात स्टार झाली. 

मीडिया रिपोर्टनूसार, नवोदिता शर्माने वर्तमान पत्रातील जाहिरातीच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. 'सनम बेवफा' चित्रपटाचे निर्माते सावन कुमार एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि त्यांनीच वर्तमानपत्रात ही जाहिरात दिली होती. नवोदिताने ही जाहिरात पाहिली आणि ऑडिशन्स दिल्या आणि चित्रपटासाठी तिची निवड झाली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटात तिला सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली. 

'सनम बेवफा' चित्रपटानंतर नवोदिताने 'हिना' (1991), 'उमर 55 की दिल बचपन का' (1992), 'जान से प्यारा' (1992), '1942' असे अनेक चित्रपट केले.  एक प्रेम कथा (1993), 'जय किशन' (1994), 'इक्के पे इक्का' (1994), 'आजा सनम' (1994), 'आझाद' (1994), 'हाहाकार' (1996) इत्यादी चित्रपटांमध्येही काम केलं, परंतु तिला यश मिळू शकलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नवोदिताने २०१६ मध्ये अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या सतीश शर्मा यांच्यासोबत लग्न केलं.सध्या ही अभिनेत्री अमेरिकेतील ऑरलँडोमध्ये राहते आणि तिथे एक डान्स अकॅडमी चालवते. लग्नानंतर अभिनेत्री स्वत: ची डान्स अकॅडमी सुरू करून सध्या नवोदिता इतरांना डान्सचे धडे देते. 

टॅग्स :बॉलिवूडसलमान खानसनम बेवफा