Join us  

पोटासाठी बनला पत्रकार; हिरो बनण्याठी बॉलिवूडमध्ये आला अन् टॉपचा खलनायक झाला, कोण आहे हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 2:46 PM

प्रेम चोपडा यांनी बॉलिवूडमध्ये नकारात्मक भूमिका साकारून खूप नाव कमावलं. बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये प्रेम चोपडा यांची गणना केली जाते.

Prem Chopra : कोणताही चित्रपट यशस्वी होण्यासाठी त्यातील नायकाबरोबरच खलनाकाची भूमिका देखील महत्वाची मानली जाते. त्यांच्या चित्रपटांतील भूमिकेंमुळे खऱ्या आयुष्यातही काही कलाकारांना प्रेक्षक खलनायकच समजत होते.आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, जे वयाची ८० ओलांडल्यानंतरही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेले पाहायला मिळतात. 

प्रेम चोपडा यांचा जन्म  ३२ सप्टेंबर १९३५ पाकिस्तानातील  लाहोर येथे झाला. भारत-पाक फाळणीनंतर त्याचं कुंटुंब शिमल्यामध्ये स्थायिक झालं. या रिल लाईफ खलनायकाच्या वडिलांची आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा होती. परंतु प्रेम यांचा कल अभिनयाकडे होता.

वडिलांनी दिला होता सल्ला - 

एका मुलाखतीत प्रेम चोपडा यांनी त्यांच्या स्वप्नांबद्दल वडिलांची काय  प्रतिक्रिया होती याबाबत खुलासा केला होता. " ज्या वेळी मी शिमल्याहून मुंबईत आलो तेव्हा माझे वडील मला म्हणाले की मला तुझ्या स्वप्नांमध्ये अडथळा बनायचं नाही. परंतु, मला तुला हे सांगावेसे वाटते की अभिनय हा सुरक्षित व्यवसाय नाही. म्हणून जर तुला मुंबईत जायचे असेल तर तुला उत्पन्नाचं साधन शोधावं लागेल.

प्रेम यांनी आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला गांभीर्याने घेतला आणि मुंबईमध्ये आल्यावर 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संचलन विभागात नोकरी करण्यास सुरुवात केली.  मुंबईत आल्यानंतर त्यांना बराच संघर्ष करावा लागला.

सुमारे ३८० चित्रपटांमध्ये केलं काम -

मुलाखतीदरम्यान, प्रेम चोपडा यांनी त्याच्या खाजगी आयुष्यावर देखील भाष्य केलं.  एका रेल्वे प्रवासादरम्यान, त्यांना त्यांचा पहिला पंजाबी चित्रपट 'चौधरी करनैल सिंग' मुख्य अभिनेता म्हणून ऑफर करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी प्रेम यांना २५०० रुपये मानधन मिळालं होतं. प्रेम चोप्रा यांनी आपल्या करिअरमध्ये 'शहीद '१९६५, 'बॉबी' १९७३ 'बेताब '१९८३ 'गुप्त' १९९७ आणि 'कोई मिल गया'२००३  सह सुमारे ३८० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :प्रेम चोपडाबॉलिवूडसेलिब्रिटी