Join us

बॉबी देओलला टीव्ही शोची आॅफर

By admin | Updated: August 30, 2014 04:24 IST

अभिनेता बॉबी देओल लवकरच टीव्हीवर दिसण्याची शक्यता आहे.

अभिनेता बॉबी देओल लवकरच टीव्हीवर दिसण्याची शक्यता आहे. नुकत्याच मिळालेल्या एका टीव्ही शोच्या आॅफरबाबत बॉबी गांभीर्याने विचार करीत असल्याचे समजते. एका हिंदी चॅनलवर मर्यादित एपिसोड असलेल्या एका हेरगिरीवर आधारित सिरियलची आॅफर बॉबीला मिळाली आहे. सूत्रांनुसार सिरियलच्या निर्मात्याला आजवर टीव्हीवर न झळकलेल्या कलाकाराला मुख्य भूमिकेत घेण्याची इच्छा आहे. बॉबीने या शोला होकार दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.