Join us

ब्लॉकबस्टर सिनेमा अन् कोटींचा गल्ला

By admin | Updated: July 16, 2015 05:09 IST

काही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच हीट मानले जातात. तर काही चित्रपटांची प्रदर्शनापूर्वी चर्चाही नसताना ते चक्क १०० क ोटींच्या क्लबमध्ये सामिल होतात, अशा चित्रपटांसाठी

काही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच हीट मानले जातात. तर काही चित्रपटांची प्रदर्शनापूर्वी चर्चाही नसताना ते चक्क १०० क ोटींच्या क्लबमध्ये सामिल होतात, अशा चित्रपटांसाठी ‘माऊथ पब्लिसीटी’ संजीवनी ठरते. सध्या बॉक्स आॅफिसवर माहोल करीत असलेला ‘बाहुबली’ व ईदला प्रदर्र्शित होणारा ‘बजरंगी भाईजान’ यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडत आहे. याच मार्गाने बॉक्स आॅफिसवर यशस्वी झालेल्या व क्रिटीक्सची वाहवा लुटलेल्या काही चित्रपटांची ही माहिती खास सीएनएक्सच्या वाचकांसाठी...अखेर आपण सर्व कमाईची गोष्ट करतो, बॉक्स आॅफिसवर एखाद्या चित्रपटाने किती कमाई केली याचा विचार के ला जातो. मात्र पैशांच्या तराजूत न तोलता येणाऱ्या काही सुंदर कलाकृतीही असतात. यातूनच अनेक रेकॉर्ड मोडतात नवे तयार होतात. सलमानभाईचा ‘बजरंगी’ काय कमाल करतो यासाठी थोडा ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’! ‘बजरंगी भाईजान’कडे नजरसध्या वितरकांना रमजान ईदची प्रतीक्षा आहे कारण १८ तारखेला सलमान खानचा मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘बजरंगी...’ २०० कोटींचा गल्ला जमवेल असे अंदाज लावण्यात येत आहेत. ‘शोबिझ’मध्ये आपणच माहीर आहोत असे समजणारे तर २०० क ोटी काय या सिनेमाने ३०० कोटी गोळा केले तरी आश्चर्य वाटू नये असे सांगू लागले आहेत. मागील आठवड्यात भारतातील सर्वांत महागडा सिनेमा ‘बाहुबली’ रिलीझ झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी चित्रपट सृष्टीतील सारे विक्र म मोडीत काढून सुमारे ६० कोटींची कमाई केली. या चित्रपटाबाबतही क्रिटीक्सनी आधीपासूनच अंदाज लावले होते. ते खरे ठरले आहेत.फेस्टिवलचा फायदाआतापर्यंत आपण आकडेवारीबाबत चर्चा केली. याचा स्क्रिप्टशी फारसा संबध नाही. एखाद्या चित्रपटाच्या यशाचा विचार केल्यास अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यासाठी प्रदर्शनापूर्वीची हवा तयार करणे, मोठी स्टारकास्ट असणे, दिवाळी, ईद, ख्रिसमस यासारख्या विशिष्ट दिवशी चित्रपटाला रिलीज करणे याचा देखील समावेश आहे. क्रिटीक्सची धास्ती तरी हीटमागील वर्षी दिवाळीत प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटाबाबत क्रि टीक्स काहीही लिहोत. मात्र या सिनेमाने चाहत्यांच्या बळावर तब्बल ३८३ कोटींचा गल्ला जमविला. समीक्षक राजीव मसंद म्हणतात, या सिनेमाच्या पटकथेबाबत आम्ही फारशी चांगली प्रतिक्रिया दिली नव्हती. आम्ही देखील सिनेमाचे अभ्यासकच आहोत, आमचे अंदाज चुकू शकतात, आम्ही चित्रपटाबाबत वर्तविलेले अंदाज एकूण गोष्टीवर आधारित नसतात.

-meha.sharma@lokmat.com