Join us  

साई बाबांचा आशीर्वाद पोहोचला 'मेरे साई'च्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 7:42 PM

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

अनेक लोक मोठ्या भक्तिभावाने व नियमितपणे पाहत असल्यामुळे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग आणि विश्वास एवढा वाढला आहे की प्रत्यक्ष साई बाबांचा आशीर्वाद सेटवर पोचला आहे. नुकतेच मेरे साईंच्या सेटवर अरुण गायकवाड साई बाबांची ९ नाणी घेऊन आले होते. समाधी घेण्याआधी ही नऊ नाणी त्यांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिली होती आणि काही दिवसांपूर्वी त्यांचा नातू ही नाणी घेऊन सेटवर आला होता. त्याद्वारे साईबाबांचा आशीर्वाद सर्व कलाकारांपर्यंत पोहोचवला. 

अरुण गायकवाड यांच्या इच्छेनुसार सेटवरील द्वारकामाईमध्ये या नाण्यांची आरती करण्यात आली. त्यामुळे सेटवर इतकी सकारात्मकता निर्माण झाली होती की अबीर सुफीच नाही तर प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाला ह्या कार्यक्रमाचा भाग असल्याबद्दल धन्य वाटत होते. साईंची भूमिका करत असलेला अबीर सुफी म्हणतो, "मेरे साई मधील प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाला अगदी नशीबवान असल्यासारखे वाटत होते. कारण आमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आम्हाला शिर्डीला जायला वेळ मिळत नाही आणि साई बाबांची खरीखुरी ९ नाणी आम्हाला आशीर्वाद द्यायला सेटपर्यंत आली हा खरेच एक चमत्कार आहे. लोक नेहेमी ह्या नाण्यांपर्यंत जातात आणि प्रार्थना करतात पण मी स्वतःला नशीबवान समजतो की आम्हाला आशीर्वाद द्यायला ही नाणी आमच्यापर्यंत आली. ही बाबांची इच्छा होती की ती नाणी आमच्यापर्यंत यावीत आणि तसे घडले. हे फक्त लक्ष्मीबाईंच्या नातवामुळे होऊ शकले. साईबाबांनी समाधीच्या वेळेस ही नऊ नाणी लक्ष्मीबाईंना १५ ऑक्टोबर १९१८ रोजी भेट दिली. त्यांचा नातू अरुण गायकवाड हा कार्यक्रम नेहमी बघतात आणि कार्यक्रमाची लोकप्रियता बघून ते ह्या सेटवर आले." 

टॅग्स :मेरे साई मालिका