बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मृणालने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी करत तिच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं होतं. शिवाय muscles असलेल्या बिपाशाशी लग्न करत असं ती तिच्या सहकलाकाराला म्हटल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मृणालचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. मृणाल ठाकूरच्या या व्हिडीओनंतर आता बिपाशानेही इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत तिला चोख उत्तर दिलं आहे.
बिपाशा बासूची पोस्ट
"एक सशक्त स्त्री दुसऱ्या स्त्रीला प्रोत्साहन देते. Muscles बनवा सुंदर महिलांनो... ते Muscles तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी मदत करतात. महिला तंदुरुस्त असू शकत नाहीत हा जुना विचार काढून टाका", असं बिपाशाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. स्वत:वर प्रेम करा हा हॅशटॅगही तिने वापरला आहे.
काय म्हणाली होती मृणाल ठाकूर?
व्हिडीओत मृणाल सहकलाकार आणि अभिनेता असलेल्याअरिजीतसोबत फिटनेसबद्दल बोलत आहे. अरिजीत मृणालला हेडस्टँड आणि पुश अप्सबद्दल सांगत आहे. त्यावर ती म्हणते की "तुला अशा मुलीसोबत लग्न केलं पाहिजे जिचे muscles असतील. जा आणि बिपाशासोबत लग्न कर". त्यावर अरिजीत तिला म्हणतो की "ती जर या शोमध्ये असती तर तुला रोलही मिळाला नसता". त्यावर मृणाल म्हणते की "मी तिच्यापेक्षा उत्तम आहे".