Join us

सबसे बडा कलाकार मधील बसंतीने घेतला ब्रेक

By admin | Updated: April 8, 2017 03:17 IST

"सबसे बडा कलाकार" हा शो फॉर्मेटसह छोट्या पडद्यावर फुट आॅन धमाल करण्याकरिता सज्ज आहे.

"सबसे बडा कलाकार" हा शो फॉर्मेटसह छोट्या पडद्यावर फुट आॅन धमाल करण्याकरिता सज्ज आहे. यामधील छोट्याशा प्रतिभाशाली मुलांनी आपल्या अदाकारीने बॉलिवूडच्या कलाकरांनाही थक्क केले आहे. या मुलांना देशभरातील हजारो मुलांमधून निवडण्यात आले आहे. ही मुले आपल्या अ‍ॅक्टमध्ये जीव ओततात. एक अशी उमेदवार आहे, चार वर्षांची आराध्या मेहता, जिने आपल्या बसंती अ‍ॅक्टने परीक्षकांचे मन जिंकले आहे. या चार वर्षांच्या मुलीकडून जवळपास दोन मिनीटांचा डायलॉग बोलताना पाहणे खूपच अनोखा अनुभव होता. सेटवर उपस्थित एक सूत्राने सांगितले की, बोमन इराणी या मुलीबाबत बरेच चिंतित होते. डायलॉग बोलण्याच्या दरम्यान एक असा क्षण होता, जेव्हा वाटले की तिला धाप लागत आहे. हे पाहून बोमन इराणी पाण्याची बाटली घेऊन तिच्याकडे पळाले, हेच कारण आहे की, या मुलांना उद्याचा "सबसे बडा कलाकार" म्हटले जात आहे. आराध्याने पुढील क्षणालाच स्वत:ला सावरले आणि आपला पूर्ण डायलॉग बोलत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.