Join us  

Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी २मध्ये दिसणार सनी लिओनी?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 4:14 PM

Bigg Boss OTT 2 : आजपासून सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस (Bigg Boss) ! लवकरच बिग बॉस बिग ओटीटी सीझन २ येणार असून सगळेच यासाठी उत्सुक आहेत. यात एक हटके ट्विस्ट म्हणजे बिग बॉस ओटीटीमध्ये २ मध्ये सनी लिओनी दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत आणि आता प्रेक्षकांना नेमका प्रश्न पडला की ती स्पर्धक आहे की सनी फक्त लाँच एपिसोड मध्ये दिसणार? चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल

याबद्दल सनी लिओनीच्या जवळच्या एका स्रोताने खुलासा केला की, सनी लिओनी बिग बॉस ओटीटी सेटवर आहे कारण ती लॉन्च एपिसोडला उपस्थित राहणार आहे. ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होणार नसून शोच्या लाँचसाठी सनी खास पाहुणी असणार आहे. सनी लिओनी  सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि त्यानंतर सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी चित्रपटाच्या उल्लेखनीय यशामुळे चर्चेत आहे. तिच्या चार्ली या पात्राला जागतिक प्रेक्षकांकडून मिळणार प्रेम उल्लेखनीय आहे.

सलमान खानचं डिजिटल माध्यमात पदार्पण

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे आजपासून सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर या शोची खूप चर्चा आहे. १७ जूनपासून या शोचे जिओ सिनेमा स्ट्रिमिंग होणार आहे. सलमान खान बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीजनपासून आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. 

टॅग्स :सनी लिओनीबिग बॉससलमान खान