Join us  

Bigg Boss Marathi 3, Episodes, 17 Oct: शिव ठाकरे- नेहा शितोळे पुन्हा होणार सहभागी? प्रोमो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 1:15 PM

Bigg boss marathi 3: या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी २'चा विजेता शिव ठाकरे आणि नेहा शितोळे बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे.

ठळक मुद्दे'बिग बॉस मराठी ३' मध्ये शिव ठाकरे आणि नेहा शितोळे पुन्हा एकदा स्पर्धक म्हणून सहभागी होणार?

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात विविध टास्कसोबतच वादविवाद, भांडण, मतभेद, प्रेम प्रकरणं अशा अनेक गोष्ट दररोज घडत असतात.  मात्र, याच शो मुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होतात. सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून अनेक सेलिब्रिटी स्पर्धक या नव्या पर्वात पाहायला मिळत आहेत. यातील काही चेहरे ओळखीचे आहेत. तर, काही चेहरे प्रेक्षकांसाठी अगदीच नवीन आहेत. मात्र, आता हा शो चांगलाच रंगात आला असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आदिश वैद्य (adish vaidya) या नव्या स्पर्धकाची घरात एण्ट्री झाली असून लवकरच नेहा शितोळे आणि शिव ठाकरे सुद्धा यंदाच्या पर्वात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अलिकडेच कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी २'चा विजेता शिव ठाकरे आणि नेहा शितोळे बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांची एण्ट्री पाहून घरातील स्पर्धकदेखील आश्चर्यचकित झाले असून घरात आनंदाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी ३' मध्ये शिव ठाकरे आणि नेहा शितोळे पुन्हा एकदा स्पर्धक म्हणून सहभागी होणार की केवळ गेस्ट म्हणून आले आहेत हे आजचा भाग पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना त्यामागील उलगडा होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीशीव ठाकरेनेहा शितोळेसेलिब्रिटी