Join us  

तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार बिग बॉस फेम अभिनेता, नॅशनल टीव्हीवर केलं होतं पहिलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 2:17 PM

नॅशनल टीव्हीवर केलेल्या या लग्नाची चर्चादेखील खूप झाली होती, पण हे लग्न फारकाळ टिकलं नाही.

सलमान खानचा शो 'बिग बॉस'च्या चौथ्या सीझनमध्ये झळकलेले स्पर्धक अली मर्चंट त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने टीव्ही अभिनेत्री सारा खासनसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं होतं. बिग बॉसच्या घरात त्यांनी लग्न केलं होतं. या लग्नाची खूप चर्चादेखील झाली होती, मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी 2011 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. यानंतर अलीने 2016 मध्ये अनमशी लग्न केले. त्याचे हे नातेही टिकले नाही. आता तो तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. 

अली मर्चंटच्या पुन्हा प्रेमात पडला आहे. याची कबुली त्याने सोशल मीडियावर दिली. इंस्टाग्रामवर त्याने गर्लफ्रेंड अंदलीब जैदीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसतो आहे. अली गुडघ्यावर बसून अंदलीबला अंगठी घालताना दिसत आहे. अली मर्चंटची रोमँटिक अंदाज बघून अंदलीब भावूक होते आणि  त्याला मिठी मारते. हा व्हिडीओ शेअर करताना अलीने लिहिले, 'ती हो म्हणाली.

कोण आहे अंदलीब जैद?अली मर्चंट गेल्या वर्षभरापासून अंदलीब जैदला डेट करतो आहे. त्यांच्या नात्याला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अंदलीबबद्दल बोललो तर ती हैदराबादची मॉडेल आहे.

अली मर्चंट त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. त्याने 'लिबास' या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसारा खान