Join us  

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: १५ वर्षांनंतर परतली 'मंजुलिका', कार्तिक आर्यन भटकत्या आत्म्याशी कसा करेल सामना?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 3:18 PM

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया २' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiyaa 2)चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे, ज्याला खूप पसंती मिळते आहे. राजपाल यादव(Rajpal Yadav)ने पुन्हा एकदा आपल्या कॉमेडीने कमालीची भर घातली आहे.

ट्रेलरमध्ये, कार्तिक आर्यन एका तांत्रिकाच्या भूमिकेत दिसतो आहे, जो दावा करतो की तो भूत पाहू शकतो, परंतु नंतर त्याला मंजुलिका नावाच्या एका भटकत्या आत्म्याचा सामना करावा लागतो. त्यानंतर तो तांत्रिक काय करतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. त्याचवेळी ट्रेलरमध्ये कियारा आणि कार्तिक यांच्यात रोमान्सही पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तब्बूचाही महत्त्वाचा भाग आहे, ज्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. 

'भूल भुलैया २' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मंजुलिका कियारा आडवाणीच्या शरीरात प्रवेश करते आणि संपूर्ण घरात गोंधळ माजवते. राजपाल यादवचे डायलॉग गुदगुल्या करणारे आहेत. त्याचा पंडित लूक मला हसायला भाग पाडतो.

'भूल भुलैया २' या दिवशी येणार भेटीला'भूल भुलैया २' चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बझ्मी यांनी केले आहे. या चित्रपटाचे संवाद फरहाद सामजी आणि आकाश कौशिक यांनी संयुक्तपणे लिहिले आहेत. २००७ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया' या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, मुराद खेतानी आणि अंजुम खेतानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २० मे, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनकियारा अडवाणीराजपाल यादव