Join us  

भाग्यश्री मोटेनं बॉयफ्रेंडसाठी शेअर केली स्पेशल पोस्ट, म्हणाली - 'यापूर्वी मी कधीही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 1:46 PM

Bhagyashree Mote:भाग्यश्री मोटे हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेला डेट करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.  तिला बोल्ड फोटोंमुळे तिला अनेकदा ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले होते. हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे(Vijay Palande)ला ती डेट करते आहे. दरम्यान त्याच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

विजय पलांडेच्या वाढदिवसानिमित्ताने भाग्यश्री मोटेने एक स्पेशल पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह! तू माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल देवाचे मी आभार मानते. मला यापूर्वी कधीही इतके सुरक्षित वाटले नव्हते. आपल्याबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे आणि ते कधीही संपणार नाही.

भाग्यश्री मोटे हिने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' या चित्रपटात दिसली होती. तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.

भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.

टॅग्स :भाग्यश्री मोटे