Join us  

'भाग मिल्खा भाग'साठी फरहान व सोनमने घेतलेलं ११ रुपये मानधन; ज्यांच्यावर चित्रपट बनला त्यांनी....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 2:35 PM

 मिल्खा सिंग यांची भूमिका साकारण्यासाठी फराहन अख्तरने प्रचंड मेहनत घेतली होती, पण...

दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाला १२ जुलै रोजी १० वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि सर्वोत्कृष्ट बॉलिवूड बायोपिकच्या यादीत आजही या सिनेमाचे स्थान आबाधित आहे.  मिल्खा सिंग यांची भूमिका साकारण्यासाठी फराहन अख्तरने प्रचंड मेहनत घेतली होती. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. 

'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाने ३१ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. परंतु, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या फरहान अख्तरने केवळ ११ रुपयेच मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. मात्र, त्यामागेदेखील एक खास कारण असल्याचं म्हटलं जातं.

'या चित्रपटासाठी तू किती मानधन घेतलं'? असा प्रश्न फरहानला विचारण्यात आला होता. त्यावेळी "मी ११. ४ सेकंदसाठी १०० मीटर चार्ज केला आहे. ही वेळ त्या प्रसिद्ध असलेल्या रेसची वेळ होती. ज्यात मिल्खा सिंग केवळ २ मिलीसेकंदमुळे ऑलिंम्पिक विनर होता होता राहिले", असं फरहान म्हणाला होता. 

दरम्यान, या चित्रपटासाठी फरहान अख्तर आणि सोनम कपूरने ११ रुपये मानधन घेतलं होतं. तर प्रकाश राज यांनी कोणतंही मानधन घेतलं नव्हतं. तसंच  दिवंगत मिल्खा सिंग यांनीदेखील फक्त १ रुपया फी घेतली होती. क्वचितच कोणाला माहित असेल की दिवंगत मिल्खा सिंग यांनी फरहान अख्तरला त्यांचे शूज भेट दिले होते जे त्यांनी रोम ऑलिम्पिक दरम्यान या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घातले होते.

टॅग्स :फरहान अख्तरसोनम कपूर