गेल्या काही काळात हिंदी चित्रपटांमधील विषयांमध्ये खूप बदल झाले आहेत. यात खेळांवरही ‘चक दे इंडिया’, ‘भाग मिल्खा भाग’ असे चित्रपट तयार झाले. क्रिकेटव्यतिरिक्त या खेळांतील इतर घटनांवर प्रकाश टाकणारी कहाणी यानिमित्ताने समोर आली. या चित्रपटांना अमाप लोकप्रियता मिळाली. अशा चित्रपटांमध्ये आता बॉक्सिंगचीही भर पडली आहे. बॉक्सिंगमध्ये पाच वेळा विश्वजेतेपद मिळवलेल्या मणिपूरच्या मेरी कॉमचे आयुष्य, खेळाविषयी समर्पण वृत्ती, त्याचबरोबर जुळ्या मुलांची आई झाल्यानंतरही बॉक्सिंगमध्ये पुन्हा पदार्पण करताना मिळवलेले यश, अशा अनेक अंगांना हा चित्रपट स्पर्श करतो. तद्दन व्यावसायिक चित्रपट दाखवण्यापेक्षा या चित्रपटाने मेरीचा खरा संघर्ष दाखवला आहे.
मणिपूरमधल्या सामान्य घरातल्या मुलीची ही कथा. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे सामथ्र्य तिच्यात आहे. यासाठी मैत्रिणीच्या प्रियकराशी भांडायलाही ती मागेपुढे पाहत नाही. तसेच बॉक्सिंग या मुलांच्या खेळाची तिला आवड आहे, पण हा पुरुषांचा खेळ असल्याने तो खेळण्यास वडिलांचा कडवा विरोध असतो. पण जेव्हा वडील आणि खेळ यापैकी एक निवडण्याची वेळ येते तेव्हा ती खेळाची निवड करत वडिलांना धक्का देते. इथूनच तिच्या आयुष्याला ख:या अर्थाने सुरुवात होते. या मुलीतली जिद्द तिचे प्रशिक्षक ओळखतात. ट्रेनिंगदरम्यान तिला ‘मेरी कॉम’ हे नवे नाव मिळते. या नावाबरोबरच कोलकातापासून दिल्लीर्पयत सुरू झालेला प्रवास तिला राष्ट्रीय स्तरार्पयत ओळख देतो. तर एकीकडे खेळाडूंना नाश्त्यासाठी एक कप चहा आणि केळे देऊन बॉक्सिंग फेडरेशनचे सेक्रेटरी खेळाडूंना कशी वागणूक देतात याची झलकही पाहायला मिळते. पण या वागणुकीनेही मेरी खचत नाही. ती तीन वेळा विश्वकप जिंकते. मात्र आपल्या मित्रशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खेळापासून काही काळ लांबही राहते. तिला एक कुटुंब मिळते. तिला जुळी मुले होतात. या सगळ्यात आपले बॉक्सिंग मागे राहिलेय याची खंत तिला जाणवते. अशात तिला नव:याची भरभक्कम साथ मिळते आणि पुन्हा या खेळाकडे वळण्याचा निश्चय मेरी करते. पण या वेळी मात्र मुलांना सांभाळण्यापासून ते फेडरेशनबरोबरचे वाद ङोलण्यार्पयत भरपूर संघर्ष करावा लागतो. एका खेळादरम्यान नव्या खेळाडूकडून तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या मेरीला पराभवाचा जबर धक्का सहन करावा लागतो. त्या वेळी अनेक वाद होतात. मणिपूरची असल्याने तिच्यावर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रियाही उमटतात. काही कारणांमुळे फेडरेशनही मेरीवर बंदी घालते. पण या सगळ्यातून मार्ग काढत मेरी प्रशिक्षण चालू ठेवते. मुलांची जबाबदारी घेतलेला नवरा आणि कठीण प्रशिक्षण यांचा ताळमेळ साधत मेरीचा सराव सुरू असतो. त्यात तिला पुन्हा खेळण्याची संधी मिळते. सगळ्या संकटांवर मात करत मेरी विश्वकप जिंकते.
वैशिष्टय़े - एका साधारण महिलेच्या खडतर आयुष्यावरचा हा प्रवास रोमांचकारी आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे मेरी कॉमची परवानगी घेऊन बनलेल्या या चित्रपटातील घटना पडताळून पाहणो गरजेचे वाटत नाही. एकंदरीत काल्पनिक कथांमध्ये मसाले वापरत प्रेक्षकांचे यथेच्छ मनोरंजन करणा:या लोकांसाठी हा संपूर्ण नवा अनुभव आहे. हा अनुभव विलक्षण असून एका सर्वसाधारण महिेलेला कठीण प्रसंगात करावा लागणारा सामना आपणही अनुभवतो आहोत असेच वाटते. तसेच खेळाबाबतीत प्रशासन कसे दुजाभाव करते याचाही अनुभव हा चित्रपट देतो. मात्र या सगळ्यात लक्षात राहतो तो मेरी कॉमचा संघर्ष. हा संघर्ष पडद्यावर यथार्थपणो उतरवण्यात प्रियंका चोपडाने बाजी मारली आहे. एखाद्या कलाकाराला करिअरच्या या टप्प्यावर अशा प्रकारचा चित्रपट मिळणो खरेच आव्हानात्मक असते. प्रियंकाच्या करिअरमधील ही लाजवाब भूमिका आहे. मेरीच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तिने सहजपणो साकारली आहे. ही भूमिका प्रियंका जगली आहे, असेच म्हणावे लागेल. या भूमिकेसाठी प्रियंकाशिवाय दुस:या कोणाचा विचारच करता येणार नाही, असे म्हणावेसे वाटते. सहकलाकारांनीही उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत. मेरी कॉमच्या नव:याच्या भूमिकेतील दर्शन कुमारचा हा पहिलाच चित्रपट. त्यानेही चांगले काम केले आहे. तर कडक प्रशिक्षकाच्या भूमिकेत सुनील थापा यांनी लाजवाब काम केले आहे. चित्रपटाचे संगीतही उत्कृष्ट आहे. गाणी आणि पाश्र्वसंगीत चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेतात. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात ओमंग कुमार यांनी बाजी मारली आहे.
उणिवा - पूर्वार्धात चित्रपटाचे संतुलन बिघडते. काही घटना अर्धवट सोडल्याने कथेची लय बिघडते. तर काही उगीचच लांबवल्यासारख्या वाटतात. त्यामुळे कथेवर परिणाम होतो. मेरीचे कुटुंबावरचे प्रेम आणि संघर्षाचा काळ यांच्यातल्या संवेदनांना योग्य न्याय दिलेला नाही. मात्र उत्तरार्धात चित्रपट पुन्हा लय पकडतो.