Join us

बंगाली बालांची बॉलिवूडला मोहिनी...!

By admin | Updated: April 28, 2017 00:51 IST

कलाकार बॉलिवूडमध्ये एंट्री करताना त्याच्यासोबत त्याची जात, धर्म, स्वभाव किंवा प्रादेशिकता वगळता केवळ अभिनयाच्या जादूसह येतो

कलाकार बॉलिवूडमध्ये एंट्री करताना त्याच्यासोबत त्याची जात, धर्म, स्वभाव किंवा प्रादेशिकता वगळता केवळ अभिनयाच्या जादूसह येतो. मात्र, त्याची बोली, त्याचा स्वभाव, त्याचे संस्कार त्याची पाठ सोडत नाहीत. भारताच्या विविध प्रांतातून बॉलिवूडमध्ये कलाकार आले. एक काळ तर बंगाली बालांनीच गाजवला. आजही ‘बी टाऊन’मध्ये अशा बंगाली अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाने चित्रपट रसिकांना अक्षरश: घायाळ करतात. पाहूयात, मग कोण आहेत या बंगाली बाला ज्यांची भूरळ बॉलिवूडला पडली.

काजोल ‘बॉलिवूडचा सिंघम’ अजय देवगनची पत्नी आणि राजची ‘सेनोरिटा’ म्हणून काजोलवर अनेक रसिक फिदा आहेत. तिची स्टाईल स्टेटमेंट, फॅशन सेन्स अगदी हटके असतात. ९०च्या दशकापासून तिने साकारलेले चित्रपट, गाजवलेल्या भूमिका आपण विसरूच शकत नाही. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ आणि ‘कुछ कुछ होता हैं’ मधील तिच्या लुकचे तर चाहते दिवाने आहेत. राणी मुखर्जी गुड लुक्स आणि उत्कृष्ट अभिनय यांचे अनोखे समीकरण म्हणजे राणी मुखर्जी. ‘मर्दानी’ चित्रपटात पोलिस आॅफिसरची दमदार भूमिका साकारल्याने राणी मुखर्जीला मर्दानी म्हणून आपण जास्त पसंत करतोय. मुलगी ‘अदिरा’च्या जन्मानंतर तिने हा चित्रपट केल्याने तिच्या अभिनयाचे जास्त कौतुक करण्यात आले. तसेच ‘कुछ कुछ होता हैं’,‘युवा’,‘साथियाँ’ या चित्रपटांमध्ये तिच्या चुलबुल्या व्यक्तिमत्त्वाने अभिनयाचा अनोखा टप्पा गाठला. तर ‘ब्लॅक’, ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटांमध्ये तिने तिच्या अभिनयाने रसिकांना अंतर्मुख केले.बिपाशा बसु संपूर्णपणे बंगाली संस्कृती जर कुणाच्या व्यक्तिमत्त्वातून प्रतिबिंबित होत असेल तर ती अभिनेत्री म्हणजे बिपाशा बसु. अभिनयासोबतच बिप्सने हॉटनेसची नवी व्याख्या फिल्मी जगताला पटवून दिली. सुरूवातीच्या काळात तिची अभिनेता जॉन अब्राहमसोबत असलेली रिलेशनशिप सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. ‘अजनबी’,‘राझ’,‘अलोन’,‘जिस्म’ यासारखे चित्रपट साकारले. आता मात्र ती मिसेस करणसिंग ग्रोव्हर असून त्याच्यासोबत अत्यंत आनंदात आहे.सुश्मिता सेन १९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावणारी प्रथम भारतीय अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन. ‘मैं हूँ ना’,‘ बिवी नं. १’,‘सिर्फ तुम’,‘मैंने प्यार किया’,‘आँखे’ या चित्रपटांमध्ये सुष्मिताने उत्तम अभिनय साक ारून तिच्यातील आत्मविश्वास तिने दाखवून दिला. आजही सुश्मिताकडे एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनच पाहिले जाते. कोंकना सेन शर्मा ‘पेज ३’,‘ओमकारा’,‘लाईफ इन अ मेट्रो’,‘वेक अप सिड’ या चित्रपटांमध्ये अत्यंत साधेपणाने अभिनय साकारणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन शर्मा. ठराविक भूमिका आणि चित्रपट साकारणारी अभिनेत्री म्हणून कोंकणाक डे पाहिले जाते. ग्लॅमरस असण्यापेक्षाही जास्त तिला तिचा साधेपणा मिरवायला जास्त आवडतो. कोएना मित्रा कोएना मित्रा ही अशी बंगाली अभिनेत्री आहे जिला फार काळ बॉलिवूडचे ग्लॅमर अनुभवता आले नाही. तिने काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले मात्र, तिला तिच्या अभिनयासोबतच चाहत्यांचीही साथ मिळाली नाही. तिने कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर तिच्यात झालेला बदल हा कायमस्वरूपी होता.