Join us  

'भूल भुलैया ३'च्या रिलीज आधी कार्तिक आर्यनच्या हाती लागला आणखी एक मोठा प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 7:07 PM

Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन बऱ्याच कालावधीपासून दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे. सध्या त्याच्या नावावर अनेक मोठे चित्रपट आहेत. या वर्षी त्याचे २ चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) बऱ्याच कालावधीपासून दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे. सध्या त्याच्या नावावर अनेक मोठे चित्रपट आहेत. या वर्षी त्याचे २ चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. यामध्ये 'चंदू चॅम्पियन' आणि 'भूल भुलैया ३'चा समावेश आहे. पहिला चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा सिनेमा दिवाळीत रिलीज होऊ शकतो. याशिवाय कार्तिक आर्यन लवकरच 'आशिकी ३' आणि कबीर खानच्या आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. कार्तिक आपल्या लाइनअप्समध्ये समतोल साधत पुढे जात आहे. आता त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकासोबत त्याचा पुढचा सिनेमा मिळाला आहे.

कार्तिक आर्यन त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सबाबत विशाल भारद्वाजशी चर्चा करत असल्याचे समजते आहे. चित्रपटाबाबत अनेक अपडेट्सही समोर आले आहेत. विशाल भारद्वाजचे यापूर्वीचे अनेक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर आले आहेत. मात्र, ज्या सिनेमासाठी त्याची कार्तिक आर्यनसोबत चर्चा सुरू आहे. तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'पटाखा' नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा त्याचा हा दुसरा चित्रपट असेल. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनचा हा सिनेमा २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आगामी प्रोजेक्ट्स

कार्तिक आर्यन आणि विशाल भारद्वाज लवकरच हा चित्रपट सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच या वर्षाच्या उत्तरार्धात हा चित्रपट फ्लोअरवर जाईल. 'भूल भुलैया ३' नंतरचा हा त्याचा पुढचा सिनेमा असेल, जो फ्लोअरवर जाण्याची योजना आखली जात आहे. मात्र, या चित्रपटापूर्वी कार्तिक आर्यनला 'भूल भुलैया ३'चे शूटिंग पूर्ण करायचे आहे. ज्याची त्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे. विद्या बालन, तृप्ती डिमरी यांच्यासह सर्वांनी मुंबईतून पहिल्या शेड्युलला सुरुवात केली आहे. यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा चित्रपट आहे. मात्र कार्तिक आर्यनच्या पुढील चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मेकर्सकडून लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. या चित्रपटानंतर पुढील वर्षीही त्याचे किमान दोन चित्रपट प्रदर्शित होणार हे निश्चित आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यन