Join us

वडील-मुलीच्या प्रेमळ नात्याची सुंदर कथा

By admin | Updated: January 20, 2016 01:35 IST

विविध चित्रपटांमध्ये गुंफलेली वडील-मुलीच्या प्रेमळ नात्याची सुंदर कथा प्रेक्षकांना नेहमीच आवडली आहे. नुकत्याच आलेल्या ‘पीकू ’ या चित्रपटाची कथाही याच नात्यावर आधारित होती.

विविध चित्रपटांमध्ये गुंफलेली वडील-मुलीच्या प्रेमळ नात्याची सुंदर कथा प्रेक्षकांना नेहमीच आवडली आहे. नुकत्याच आलेल्या ‘पीकू ’ या चित्रपटाची कथाही याच नात्यावर आधारित होती. म्हणूनच ‘पीकू ’ला मिळालेल्या यशानंतर अमिताभ बच्चन दीपिका पदुकोनसोबत अजून अशा एका चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. ‘क्वीन’ आणि आताच आलेल्या ‘शानदार’चे दिग्दर्शन करणारे विकास बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने वडील आणि मुलीच्या नात्याला समोर ठेवून बनलेल्या चित्रपटांवर एक नजर... खूपच कमी चित्रपट असे आहेत, ज्यांची कथा वडील-मुलीच्या नात्याशी संबंधित आहे. ‘मसान’या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले. ‘मसान’ मध्ये रिचा चड्ढा आणि संजय मिश्रा यांनी वडील-मुलीची भूमिका साकारली होती आणि दोघांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. इतिहास पाहिला तर महेश भट्ट यांचे दोन अशा चित्रपटांची आठवण येते, ज्यात त्यांनी आपली मुलगी पूजा भट्टला घेतले होते. पहिला होता- ‘डैडी’. जो पूजाचा पहिला चित्रपट होता आणि अनुपम खेर यांनी तिच्या वडिलांची भूमिका केली होती. योगायोग असा की, भट्ट यांच्या दुसऱ्या चित्रपटातदेखील वडील-मुलीच्या नात्याला पूजा भट्ट आणि अनुपम खेर यांनीच साकारले. हा चित्रपट होता- ‘दिल है की मानता नहीं’, ज्याच्या शेवटी एक वडील लग्नाच्या मंडपातून आपली मुलगी पळून जाण्यावरून एवढे आनंदी होतात की मनसोक्त नाचतात.