Join us

दाढी, मिशीवाला अक्षय आवडतो

By admin | Updated: September 30, 2014 00:16 IST

दाढी व मिशा राखणारे अक्षय कुमारचे रूप मला अतिशय भावते, असे अभिनेत्री लिजा हेडन हिने सांगितले. ‘द शौकीन्स’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रसिद्ध झाले.

दाढी व मिशा राखणारे अक्षय कुमारचे रूप मला अतिशय भावते, असे अभिनेत्री लिजा हेडन हिने सांगितले. ‘द शौकीन्स’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रसिद्ध झाले. या चित्रपटात दारूच्या आहारी गेलेल्या सुपरस्टारची भूमिका अक्षय कुमार साकारत असून, लिजाही त्याची हिरोईन आहे. ‘द शौकीन्स’ हा अतिशय साधा आणि मजेदार चित्रपट आहे. अक्षयच्या निस्सिम चाहत्याची भूमिका मी साकारत आहे. दाढी आणि मिशा ठेवणारा रांगडा अक्षय मला जास्त आवडतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरात तिने स्पष्ट केले. अन्नू कपूर, अनुपम खेर आणि पीयूष मिश्र यांच्यात सर्वाधिक ‘शौकीन’ कोण आहे, असे विचारले असता, तिने अन्नू कपूरला पसंती दर्शवली. अक्षयनेदेखील लिजाचे तोंड भरून कौतुक केले. लिजाने आपल्या अभिनयाने मला मंत्रमुग्ध केले, असे तो म्हणाला.