Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बालिका वधु’च्या ‘आनंदी’ला मिळाला तिच्या स्वप्नातला राजकुमार! अविका गौर आहे प्रेमात

By रूपाली मुधोळकर | Updated: November 12, 2020 11:47 IST

सोशल मीडियावर खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली 

ठळक मुद्देबालिका वधु’ मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते.

‘बालिका वधु’ या मालिकेत आनंदीची लीड भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर  प्रेमात पडलीय. होय, अविकाने सोशल मीडियावर खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली. अविकाने इन्स्टावर दोन सुंदर फोटो शेअर केलेत. एका फोटोत अविका तिच्या स्वप्नातल्या राजकुमारासोबत हातात हात घालून गोव्याच्या समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. दुस-या फोटोत दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवलेले दिसत आहेत. 

आता अविकाचा हा स्वप्नातला राजकुमार कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे नाव आहे मिलिंद. सध्या अविका टीव्ही शो ‘रोडिज’ फेम मिलिंद चंदवानीला डेट करतेय. मिलिंदसोबत अविका सध्या गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करतेय. या व्हॅकेशनचे फोटो शेअर करत तिने प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे.

‘बालिका वधु’ मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती ससुराल सिमर का, झलक दिखलाजा,  फियर फैक्टर- खतरों के खिलाड़ी  या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.  

माझी प्रार्थना परमेश्वराने स्वीकारली...माझी प्रार्थना परमेश्वराने स्वीकारली. मला माझे प्रेम मिळाला. हा माझा आहे आणि मी त्याची. तुम्हाला समजून घेणारा, तुम्हाला प्रोत्साहित करणारा, तुमची काळजी घेणारा पार्टनर मिळणे अनेकदा अशक्य होते. अशी व्यक्ती मिळणे स्वप्नवत वाटते. पण हे स्वप्न नाही तर वास्तव आहे. प्रेमासारख्या सुंदर भावनेचा अनुभव दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. इतक्या लवकर लग्न करणार नाहीच. पण हो, लोक काय म्हणतील, हा विचार आता कधीच मागे पडलाय. म्हणूनच खुल्लमखुल्ला प्रेम व्यक्त करतेय..., असे अविकाने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले.

मिलिंदनेही शेअर केला फोटो

मिलिंद चंदवानी यानेही अविका व त्याचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ‘अविका नेहमी माझ्यामागे खंबीरपणे उभी असते. ती कधीच मला नाऊमेद होऊ देत नाही. तिच्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आहे, याचा मला आनंद आहे. आम्ही दोघे सोबत आहोत. इतक्यात लग्न नाही. पण अविका, मला तुझा अभिमान आहे,’ असे मिलिंदने लिहिले आहे.

टॅग्स :अविका गौर