Join us  

‘इंडिया बेस्ट डान्सर’मध्ये मंगळागौरीचा खेळ, ‘बाईपण भारी देवा’ टीमचा कल्ला; सोनाली बेंद्रेही थिरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 5:26 PM

बाईपण भारी देवा! ‘इंडिया बेस्ट डान्सर’मध्ये अभिनेत्री खेळल्या मंगळागौर, केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून जिकडेतिकडे फक्त ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाचीच चर्चा आहे. केदार शिंदेंच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत बाईपण भारी देवा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर केदार शिंदे आणि चित्रपटाची टीम अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रेक्षकांचे आभार मानत आहेत. आता बाईपण भारी देवाची टीम सोनी वाहिनीवरील ‘इंडिया बेस्ट डान्सर’ शोमध्ये हजेरी लावणार आहे.

‘इंडिया बेस्ट डान्सर’च्या आगामी भागात बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिंदेंबरोबर शिल्पा नवलकर, दीपा परब, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर दिसणार आहेत. या भागाता प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत बाईपण भारी देवामधील अभिनेत्री मंगळागौर खेळताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यावर अभिनेत्रींनी ताल धरला. या शोमध्ये परीक्षक असलेल्या सोनाली बेंद्रेलाही मंगळागौरवर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. सोनाली बेंद्रेनेही मंगळागौर गाण्यावर ठेका धरल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

“बॉडीगार्डचं डोकं फाटलं, माझ्या डोळ्याला...”, मानसी नाईकने सांगितला अपघाताचा धक्कादायक अनुभव

काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रेने ‘बाईपण भारी देवा’ टीमबरोबरचा व्हिडिओ शेअर करत या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. “५० दिवस झाले पण हा चित्रपट थिएटरमध्ये ठाण मांडून बसला आहे. कुठेही हलायचं नाव घेत नाहीये. श्रावण सुरू होतोय. मंगळागौरीचा चित्रपट आहे. केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. मग वाट कसली पाहाताय...थिएटरमध्ये जा आणि चित्रपट बघा,” असं म्हणत सोनालीने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बघण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं होतं.

“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

दरम्यान, ३० जूनला प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने ५० दिवसांत ७६ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील काकडे सिस्टर्स या सहा बहि‍णींची गोष्ट प्रेक्षकांना भावली आहे. शिल्पा नवलकर, दीपा परब, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टांगडी आणि सुकन्या मोने या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :सोनाली बेंद्रेकेदार शिंदेटेलिव्हिजन