Join us  

Anushka Shetty Photos Viral: इतकी बदलली ‘बाहुबली’ची देवसेना, अनुष्का शेट्टी आता ओळखूही येईना...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 1:13 PM

Anushka Shetty Photos Viral: अनुष्का शेट्टी आठवली की, सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते ती देवसेना. ‘बाहुबली’ अनुष्काने साकारलेल्या देवसेनेला चाहते अजूनही विसरलेले नाही. तूर्तास काय तर याच देवसेनेचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) साऊथची आघाडीची अभिनेत्री.  ‘बाहुबली’नंतर बॉलिवूडप्रेमींही तिचे ‘दिवाने’ झालेत. अनुष्का शेट्टी आठवली की, सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते ती देवसेना. ‘बाहुबली’ अनुष्काने साकारलेल्या देवसेनेला चाहते अजूनही विसरलेले नाही. तूर्तास काय तर याच देवसेनेचे अर्थात अनुष्का शेट्टीचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि हे फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.हे फोटो पाहून हीच का ती देवसेना? असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. फोटोत अनुष्काचे वजन प्रचंड वाढलेले दिसतेय. यात अनुष्काच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य आहे. पण वाढलेलं वजन पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

अनुष्का दीर्घकाळापासून लाईम लाईटपासून दूर आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर अलीकडे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर एक मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात तिने हजेरी लावली. तिला पाहून चाहते क्रेझी झालेत. पण काहींनी तिचं वाढलेलं वजन बघता, तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

अनेकांनी तिला पुन्हा स्लीम होण्याचा सल्ला दिला. खूप वाईट वाटतंय, प्लीज थोडी स्लीम हो, अशी कमेंट एका युजरने केली. अनुष्का शेट्टी व इलियाना डिक्रूज दोघीही माझ्या आवडत्या आहेत. पण दोघीही सध्या लठ्ठ झाल्या आहेत, अशी कमेंट करत एका युजरने ट्रोल केलं. अनेक चाहते अनुष्काचा बचाव करतानाही दिसले. ती स्वत: योगा इंस्ट्रक्टर आहे. तेव्हा फिटनेसबद्दल तिला शिकवू नका, असं एका युजरने अनुष्काचा बचाव करताना लिहिलं.अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती Naveen Polishetty आणि Koushik Mahata यांच्या एका सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. 

टॅग्स :अनुष्का शेट्टीबाहुबली