Join us

बाहुबली- 2ची 25 दिवसांची कमाई 1600 कोटी

By admin | Updated: May 22, 2017 19:01 IST

दिग्दर्शक एस.एस राजमौली यांच्या ‘बाहुबली 2’ अर्थात ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नव्या विक्रमांची नोंद केली आहे.

 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22- दिग्दर्शक एस.एस राजमौली यांच्या ‘बाहुबली 2’ अर्थात ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नव्या विक्रमांची नोंद केली आहे. जगभरातील कमाईने 25 दिवसामध्ये 1600 कोटीचा आकडा गाठला आहे.  28 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमाच्या तेवीसाव्या दिवशी सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 1538 करोड इतकं होतं.  खरंतर बाहुबली 2 सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.  म्हणूनच सिनेमागृहात हा सिनेमा 50 दिवस चालेल असंही बोलंलं जात होतं. बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत बाहुबली 2 हा सिनेमा 2000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार पहिला सिनेमा ठरू शकतो.  गेल्या रविवारी म्हणजेच सिनेमा प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात 7.80 कोटींचा गल्ला सिनेमाने केला होता. आता येणाऱ्या रविवारी म्हणजेच चौथ्या आठवड्यात सिनेमा 6 कोटींची मजल मारेल, असं चित्रपट समीक्षकांचं म्हणणं आहे.  
राजमौली यांचा सिनेमा आणखी काही दिवस बॉक्स ऑफिसवर कायम राहिला तर चायनामध्येही प्रदर्शित केला जाणार आहे, अशी चर्चासुद्धा सध्या सिनेवर्तुळात रंगली आहे. तिथे प्रदर्शित झाल्यावर सिनेमाच्या कमाईमध्ये आणखीही भर पडेल. बाहुबली-2 हा सिनेमा आजही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. सिनेमातील कलाकार, त्यांचा अभिनय, सिनेमाला देण्यात आलेला व्हीएफएक्स इफेक्ट सगळं काही लार्जर दॅन लाईफ आहे.