Join us  

आयशा टाकियाने हे काय केलं...ओळखणेही झाले कठीण!

By admin | Published: February 25, 2017 6:41 AM

बॉलिवूडची बबली गर्ल आयशा टाकिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. ती कोणत्याही चित्रपटामुळे चर्चेत नाही तर तिने केलेल्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे चर्चेत आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - बॉलिवूडची बबली गर्ल आयशा टाकिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. ती कोणत्याही चित्रपटामुळे चर्चेत नाही तर तिने केलेल्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे चर्चेत आहे. पण तिने एकाहून अधिकवेळा प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतं आहे. तिच्या चेहऱ्यातला बदल काही लपवू शकत नाही. यापुर्वी २००४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आयशाने लगेचच ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेमुळे ती चर्चेत आली होती. आयशाने स्वत: कधीही ही शस्त्रक्रिया केल्याचे मान्य केले नाही. मात्र तिचे फोटो याबद्दल बरेच काही सांगून गेले होते.सध्या आयशा ट्विचरवर ट्रेंडिगमध्ये आहे. तिच्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे तीला ट्रोल केलं जात आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यावरून आयशाने आपल्या ओठांची सर्जरी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. या सर्जरीमुळे आयशाची चेहऱ्यापट्टीत बदल जाणवतो. तीचे पाऊट आणि फेसकट पूर्णपणे बदलून गेल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. आधी आयशा क्यूट दिसायची. पण या सर्जरीनंतर तिचे ओठ चांगलेच जाड झालेले आहेत. त्यामुळे ती बरीच विचित्र दिसायला लागल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 2004 मध्ये टारझन द वंडर कार सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आएशाने शाहिद कपूरबरोबर दिल मांगे मोर, अभय देओल बरोबर सोचा ना था या चित्रपटात काम केले. 2009 मध्ये सलमान खानच्या वॉन्टेडमध्ये तीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती. त्यानंतर आयशाने फरहान आझमी याच्याशी विवाह केला होता. फरहान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. लग्नानंतर आएशा सिनेसृष्टीपासून काहीशी दूरच गेली होती. 2013 मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. मुलाचे नाव मिकाइल असे ठेवले होते.

बॉलिवूडमध्ये काम करणा-या अभिनेत्री आपली फिगर आणि सौदर्याबद्दल प्रचंड सर्तक असतात. जरा जरी वजन वाढले तरी त्यांच्या जिमच्या फे-या सुरु होतात. मूळात जे सौदर्य मिळाले आहे ते अधिक खुलवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी सौंदर्यप्रसाधनांच्या वापराबरोबर वेळप्रसंगी शस्त्रक्रियाचाही आधार घेतला जातो. यापूर्वी बॉलिवूडमध्ये प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, वानी कपूर, कोईना मित्रा, कंगना रानौत आणि श्रीदेवी यांनीही प्लॅस्टिक सर्जरी केल्या होत्या.