Join us  

बॉलिवूडपासून दूर,तरीही कोट्यावधींची मालकीण आहे आयशा झुलका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:25 PM

बॉलिवूडला अलविदा म्हणणारी आयशा झुलका आज एक बिझनेस वूमन आहे. बॉलिवूडमध्ये असताना आयशाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले. यापैकी एक म्हणजे, अक्षय कुमार. असे म्हणतात की, आयशा अक्षयबद्दल सीरिअस होती. पण अक्षयला मुळातच सीरिअस रिलेशनशिप नको होते. साहजिकच दोघांचेही नाते तुटले.

नव्वदच्या दशकात अशा अनेक नायिका होत्या, ज्यांनी आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या सौंदर्यानेही रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यापैकी एक अभिनेत्री आयशा झुल्का होती.आयशा झुलकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर व्हायचे.२८ जुलै १९७२ साली श्रीनगरमध्ये आयशाचा जन्म झाला होता. बॉलिवूडच्या काही आवडत्या अभिनेत्रींपैकी असणाऱ्या आयशाने खूप लवकर बॉलिवूडला अलविदा केलं. 

2003 पर्यंत आयशाचे करिअर जवळजवळ संपुष्टात आले होते. याकाळात ती सिनेमांमध्ये मुख्य नायिकेच्या नव्हे तर सहायक अभिनेत्रीच्या रुपात झळकू लागली होती. याचकाळात तिने लग्नाचा निर्णय घेतला.२००३ साली एका प्रसिद्ध व्यवसायिक समीर वशीसोब लग्न केल्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला. 

बॉलिवूडला अलविदा म्हणणारी आयशा झुलका आज एक बिझनेस वूमन आहे. बॉलिवूडमध्ये असताना आयशाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले. यापैकी एक म्हणजे, अक्षय कुमार. असे म्हणतात की, आयशा अक्षयबद्दल सीरिअस होती. पण अक्षयला मुळातच सीरिअस रिलेशनशिप नको होते. साहजिकच दोघांचेही नाते तुटले.

लग्नानंतर आयशा बॉलिवूडपासून दूर गेली पण तिने समाजकार्यांत स्वतःला झोकून दिले.बॉलिवूडमध्ये काम करण्यापेक्षा समाजकार्यात तिचे मनं जास्त रमू लागले होते.इतकेच काय तर लग्नानंतरही तिने आई न बनण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता.विशेष म्हणजे आयशाचा निर्णय कुटुंबानेही मान्य केला होता.मी स्वतःला नशीबवान समजते की मला समीर यांच्यासारखे पती म्हणून भेटले आहेत. समीर यांनी माझा असाच सांभाळ केला जसं मला हवं होतं. माझ्यावर कधी कोणता दबाव टाकला गेला नाही, माझ्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान केला गेला.'

टॅग्स :आयशा जुल्का