Join us  

इतरांची स्टाइल कॉपी करणे टाळा - झरिन खान

By admin | Published: December 30, 2016 3:17 AM

बॉलिवूडच्या अभिनेत्रींची फॅशन कॉपी करणे प्रत्येकाला आवडते. मात्र कोणत्याही अभिनेत्रीची स्टाइल आपली बनू शकत नाही हेही समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची

बॉलिवूडच्या अभिनेत्रींची फॅशन कॉपी करणे प्रत्येकाला आवडते. मात्र कोणत्याही अभिनेत्रीची स्टाइल आपली बनू शकत नाही हेही समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची आपली एक स्टाइल असते. माझ्या मते, प्रत्येकाने कोणालाही फॉलो न करता आपण ज्या कपड्यांमध्ये सुंदर दिसतो तेच कपडे परिधान करावेत. तसेच आपण परिधान केलेल्या कपड्यांमध्ये आपल्याला आत्मविश्वासाने वावरता आले पाहिजे. माझ्यासाठी तर आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्टाइलचा मोठा वाटा आहे. तसेच मी आतापर्यंत जितके बॉलिवूड चित्रपट केले आहेत. त्या चित्रपटातील भूमिकेचा ही माझ्या स्टाइलवर प्रभाव पडला आहे. मला शॉपिंगचे खूप वेड आहे त्यामुळे जिथे जाते तिथे शॉपिंग केल्याशिवाय राहावत नाही. मला स्वत:ला लंडनमध्ये शॉपिंग करायला फार आवडते. मला सगळ्यात जास्त वेगवगेळ्या प्रकारचे ट्रेंडी गॉगल वापरायला आवडतात. मेकअपमध्ये लिप लॉजही माझे फेव्हरेट आहे. या दोन्ही वस्तू माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळयाच्या आहेत. तसेच या दोन्ही वस्तू सौदर्यांला चार चाँद लावतात असे माझे मत आहे. वेस्टर्न कपड्ंयाप्रमाणेच साडीदेखील मुलींना खूप सुंदर दिसते. स्त्रीचे सौंदर्य साडीमध्येच जास्त खुलून दिसते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व, त्याची आवडनिवड, प्राधान्यक्रम यानुसार त्या व्यक्तीची ड्रेसिंग स्टाइल असते. ड्रेसिंग स्टाइलवरून माणूस ओळखला जातो, हे खरे आहे. तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात आणि लोकांना तुमच्याकडे बघून काय वाटले पाहिजे, हे प्रत्येकाला माहिती असते आणि त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती आपली ड्रेसिंग स्ंटाइल ठरवत असतो. कोणताही ड्रेस निवडण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या उंचीनुसार कपड्यांची निवड करणे आवश्यक आहे. उंची कमी असेल तर स्ट्राइप्स आणि सरळ रेषांच्या कपड्यांची निवड करणे योग्य आहे. सलवार-कमीजच्या कुत्यार्ची लांबी कमी ठेवल्याने तुमच्या स्मार्टनेसमध्ये भर पडेल हे निश्चित. तुमची उंची कमी असेल पण तुम्हाला जीन्स घालायची इच्छा असेल तर त्यावर लहान टॉप घालायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उंच आणि आकर्षक दिसाल.