Join us

बॉलिवुडमधील कलाकारांवर झालेले हल्ले

By admin | Updated: December 10, 2014 00:00 IST

गोरेगाव येथे एका गाण्याच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना गौराह खानला अकिल मलिक नावाच्या २४ वर्षीय युवकाने चपराक मारली.एका घुसखोराने ...

गोरेगाव येथे एका गाण्याच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना गौराह खानला अकिल मलिक नावाच्या २४ वर्षीय युवकाने चपराक मारली.

एका घुसखोराने श्रुती हसनच्या घरात घुसण्याचा व तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. श्रुतीने त्या घुसखोरावर दार आदळले. श्रुतीने धैर्य दाखवल्याने घुसखोराने तिथून पळ काढला.

इरफान खान आणि शाहिद कपूर - हैदर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काश्मीरमध्ये काही युवकांनी या दोघांना मारहाण केली. पोलिसांनीहस्तक्षेप केल्यावर शुटिंग पुर्ववत सुरु करण्यात आले.

बँगबँगच्या स्क्रनिंग दरम्यान जुहू येथे एका व्यक्तीने हृतिकची कॉलर धरली. यावेळी हृतिकने शांत राहत प्रकरण हाताळले.

बेगळुरु येथे एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांशी हस्तांदोलन केले नाही म्हणून एका माथेफीरुने जॉनला मारहाण केली.

२०१० साली मुंबईवरील हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण होतानाच शाहरुखने पाकिस्तनमधील एका चॅनलसाठी कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कार्यालयात जाऊन शाहरुखला मारहाण केली तसेच त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली.