Join us

आशा नेगी आणि अंश बागरी लवकरच दिसणार एकत्र, 'लव्ह का पंगा' वेबसीरिजमध्ये

By तेजल गावडे | Updated: September 24, 2020 20:55 IST

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशा नेगी आणि अभिनेता अंश बागरी लवकरच एका वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशा नेगी आणि अभिनेता अंश बागरी लवकरच एका वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव आहे लव्ह का पंगा. ही एक रोमँटिक कॉमेडी सीरिज असून हंगामा प्लेवर प्रसारीत होणार आहे.

पवित्र रिश्ता आणि अभय 2 यासारख्या टेलिव्हिजन आणि वेबशोजमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी आशा नेगी लव्ह का पंगा या सीरिजमध्ये नेहा या दिल्लीतील मॉडर्न मुलीची भूमिका साकारणार आहे. ती एकटीच काही दिवसांच्या सहलीला निघाली आहे. तर, वेल्लापंती, दिल तो हॅप्पी है जी आणि डेज ऑफ टफ्रीमध्ये प्रमुख भूमिका केलेला अंश बागरी या मालिकेत सुमीतची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सुमीत अस्सल देशी, मुक्त स्वभावाचा हरियाणवी मुलगा आहे. मनालीच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित झालेली ही मालिका म्हणजे प्रेम आणि रोमान्सचे एक आधुनिक रूप आहे.अबुझ ओरिजनल निर्मित लव्ह का पंगाचे दिग्दर्शक आहेत नितेश सिंग. 

या शोबद्दल अंश बागरी म्हणाला, "लव्ह का पंगा तुम्हाला या दोन व्यक्तिरेखांसोबत मनालीमध्ये एका सुंदर प्रवासाला घेऊन जातो. हा हलकाफुलका शो फारच मनोरंजक आणि या व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षक नक्कीच गुंतून जातील. आशासोबत काम करण्याचा अनुभव फार छान होता. ती फार मनापासून काम करते. तिचा अभिनयही फार नैसर्गिक असतो. मनालीमध्ये चित्रिकरण करताना आम्ही फार धमाल केली. आम्ही चित्रिकरणात जशी मजा केली तितकीच मजा प्रेक्षकांना हा शो पाहताना येईल, अशी मला अपेक्षा आहे."

टॅग्स :वेबसीरिज